आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा पलटवार; हिंसक घटना रोखण्यात केंद्रीय निवडणूक आयोगाला अपयश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसनसोल- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर आज (रविवार) पलटवार केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी आपण मुळीच डगमगलो नसल्याचे मोदींनी आसनसोल जाहीर सभेत सांगितले. आसनसोल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या प्रचारार्थ मोदींची जाहीर सभा झाली.
मोदी म्हणाले, देशात निवडणुकीच्या काळात हिंसक घटना सातत्याने घडत आहेत. या घटना रोखण्यात केंद्रीय निवडणूक आयोगाला अपयश आले आहे. निवडणूक काळात देशातील जनतेला संरक्षण देणे, ही आयोगाची प्रमुख जबाबदारी आहे. आयोगाने आपली जबाबदारी ओळखून निवडणूक काळात होणार्‍या हिंसक घटना थांबवाव्यात. देशात होत असलेले गैरव्यवहारही रोकावे, असा सल्लाही मोदींनी आयोगाला दिला आहे.
आयोगाकडे संपूर्ण सरकारी यंत्रणा असतानाही देशात सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. त्यांचा मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही मोदी म्हणाले. दरम्यान, मोदींनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्र परिसरात पत्रकारांशी संवाद साधला होता. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे निवडणूक चिन्ह अर्थात कमळाचे चिन्ह दाखवल्याने त्यांच्या विरोधात आयोगाने गुन्हा दाखल केला आहे.