आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Modi Will Address A Rallly In Punjab, Rahul In Dehradoon

कॉंग्रेस जनतेच्‍या डोळ्यांत मिर्ची पावडर टाकत आहेत -नरेंद्र मोदी यांची टीका

8 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंजाबमधील जगराहो येथे जाहीर सभेला भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी संबोधीत केले. तत्‍पूर्वी पंजाबचे मुख्‍यमंत्री प्रकाश‍सिंग बादल यांनी पगडी आणि तलवार भेट देऊन मोदींचा सत्‍कार केला.

मोदी यांच्‍या भाषणातील महत्त्‍वाचे मुद्दे

 • गुजरातचे पंजाबसोबत रक्‍ताचे नाते आहे.
 • गुरु नानक जेव्‍हा गुजरातमध्‍ये आले होते, तेव्‍हा कच्‍छच्‍या लखपत गुरुनी गुरुनानक यांच्‍या पादूका सांभाळून ठेवल्‍या होत्‍या. 2001 मध्‍ये झालेल्‍या भुकंपात लखपतमधील गुरुद्वारा नष्‍ट झाले होते.
 • संपूर्ण जगामध्‍ये गुजराती आणि शिख बांधव एकोप्‍याने राहत आहेत.
 • जगाला आकर्षित करण्‍याची ताकद हिंदुस्‍तानमध्‍ये आहे.
 • हिंदु आणि शिख यांच्‍या एकतेचे प्रतीक म्‍हणजे भाजपा आणि अकाली दल यांची आघाडी आहे.
 • एक रुपयांतील 15 पैसेच सामान्‍य नागरिकांपर्यंत पोहोचतात असे राजीव गांधी यांनी म्‍हटले होते. माझे विचारणे असे आहे, की बाकीच 85 पैसे कोण खात होते? आपण मला निवडुन दिल्‍यास देशाच्‍या तिजोरीचा वापर फक्‍त सामान्‍यांसाठीच होईल.
 • पगडीची इज्‍जत कोणी ठेवली असेल किंवा नसेल. पण मी या पगडीची शान वाढवेल.
 • कॉंग्रेस लाला लजपतराय यांना विसरली.
 • देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेत एक तृतीयांश भाग कृषी, एक तृतीयांश भाग उत्‍पादन आणि एक तृतीयांश भाग सर्विस सेक्‍टरचा असावा.
 • गव्‍हापासून मद्य बनविने हा शेतक-यांचा अपमान आहे.
 • 2004 मध्‍ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले असते तर आता पेंशन लागू झाले असते.
 • कॉंग्रेस डोळयांमध्‍ये धुळ फेकण्‍याचे काम करत असून आता मिर्ची फेकण्‍याचे काम करत आहे.
 • देशामध्‍ये अंमली पदार्थ विदेशातून येत असून त्‍यावर आळा घातला पाहिजे.
 • अंमली पदार्थांमुळे देशातील तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत आहे.
 • विदेशातून दहशवादी आणि कित्‍येक घातक वस्‍तु येत आहेत.

तत्‍पूर्वी सभेला संबोधीत करताना भारतीय जनता पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ्‍ासिंह यांनी पंजाबच्‍या बादल सरकारवर स्‍तुतीसुमने उधळली. ''मोदी यांना पंतप्रधान करण्याची तयारी अकाली दलानेच सर्वप्रथम दाखविली होती,'' असा खुलासाही त्‍यांनी यावेळी केला.

सभेला संबोधित करताना राजनाथसिंह म्‍हणाले, की या देशातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यत देश सुखी होणार नाही.

सभेसाठी 75 एकराचा सभामंडप उभारण्‍यात आला असून 20 एकरात हेलिपॅड तयार केले आहेत. देहराडूनमध्‍ये कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी हे एका सभेला संबोधीत करणार आहेत. जनतेला आ‍कर्षित करण्‍याचा राहूल गांधींचा प्रयत्‍न असेल. याचबरोबर उत्‍तराखंडमधील पीडित नागरिकांना व माजी सैनिकांना भेटणार आहेत.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...