आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइकच्या इंजिनाऐवजी दिसले भलतेच काही, पळापळ सुरू झाली पण नंतर कळले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाइकमध्ये इंजिनाच्या जागी बॅटऱ्या लावलेल्या होत्या. - Divya Marathi
बाइकमध्ये इंजिनाच्या जागी बॅटऱ्या लावलेल्या होत्या.
भिवाडी - 'वड्याचं तेल वांग्यावर' असे जे म्हणतात ना, तसेच काहीसा अनुभव इथं अाला. एखाद्या बाबीची शास्त्रशुद्ध रीतीने शहानिशा करून मगच त्यावर अॅक्शन घेण्यासाठी पोलिस ओळखले जातात. पण इथे जरा विचित्रच अनुभव आलाय. राजस्थानच्या अलवर-भिवाडीमेगा हायवेवर कॉसमॉस सोसायसटीमध्ये उभ्या असलेल्या एका बाइकमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली, नंतर हलकल्लोळ उडाला. सोसायटीतील लोकांच्या सूचनेनंतर तिथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र सिंह, पोलीस उपाधीक्षक सिद्धांत शर्मा आणि पीआय यांनी घटनास्थळी धाव घेतली.
-बाइकची तपासणी करण्यात आली. यात लाल रंगाच्या पल्सर बाइकमध्ये इंजिनाच्या जागी अनेक सेल आणि बॅटरीसारखे डिव्हाइस लावलेले होते. पेट्रोल टँकमध्येही बॅटरी लावलेली होती आणि बाइकचे स्पीडोमीटर, डिजिटल मीटर सुरू होते.
 
अन् हंगामा सुरू झाला...
- हे पाहून पोलिस दल आणि फायर ब्रिगेडसहित आपत्कालीन जामानिमा घटनास्थळी दाखल झाला. पूर्ण परिसरातच दहशत पसरलेली होती.
- तब्बल तासभर पसरलेल्या दहशतीनंतर बाइकचा मालक राकेश डागर तिथे गेला. एका खासगी शाळेत फिजिक्सचे शिक्षक असलेले राकेश म्हणाले, ही बाइक माझ्या एका प्रोजेक्टचा भाग आहे.
- सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी तिथून बाइक ताब्यात घेतली. बाइकचा मालक राकेशला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्येही नेले.
 
बॉम्बच्या अफवेमुळे लोक घाबरले
- सोसायटीत बॉम्बची अफवा पसरल्याने लोकांची घाबरगुंडी उडाली. स्वातंत्र्यदिन जवळ आलाय, यामुळे पोलिस याबाबतीत कोणतीही जोखीम घ्यायला तयार नव्हते. मग काय, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या. लोकांना बाइकपासून दूर केले गेले.
 
असे उलगडले रहस्य...
- तब्बल तासभर असा हंगामा झाल्यानंतर बाइकच्या मालकाने येऊन मी फिजिक्सचा टीचर आहे आणि ही माझी बॅटरीने चालणारी बाइक आहे, सोबतच या बाइकच्या प्रोजेक्टबाबतही सांगितले. यादरम्यान युवकाने बाइकही चालवून दाखवली, पण पोलिसांनी त्या तरुणालाच ताब्यात घेतले.
- स्थानिक लोक म्हणतात की, सोसायटीत काही दिवसांपासून ही बाइक पडलेली होती, पण गाडीच्या मालकाचा काही पत्ताच नव्हता.
फोटोज- रॉबिन बेनिवाल
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या घटनेचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...