आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohammad Khurshid's World Record News In Marathi

नाकाने टाइप करण्याचा विश्वविक्रम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - येथील 23 वर्षीय मोहम्मद खुर्शीद हुसेन याने 47 सेकंदांत 103 शब्द नाकाने टाइप केले. या विक्रमासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. हा अनोखा विक्रम साकार करण्यासाठी खुर्शीद दररोज सहा तास की-बोर्डवर सराव करत होता. त्याने सांगितले की नाकाने टाइप करायचे असल्याने शब्द डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. त्यामुळे एका डोळ्याने पाहून अंदाज घेऊन टाइप करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याचा सराव झाल्याने मग टायपिंग करणे जमू लागले. त्यातून हा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. याआधी मोहम्मद खुर्शीद याने इंग्रजी अक्षरे सर्वाधिक वेगाने टाइप करण्याचा विक्रम केला आहे. नाकाने टाइप करण्यासाठी मानेवर खूप ताण पडतो. त्यामुळे टायपिंग पूर्ण झाल्यानंतर डोके, गळा, मान खूप दुखते, असेही खुर्शीदने स्पष्ट केले.