मेरठ (उत्तर प्रदेश) - क्रिकेटर मोहम्मद शमीचे वडील तौसीफ अहमद यांनी आमच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. आम्हाला धमकावण्यासाठी गोहत्येसारखा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे म्हणणे आहे, की शमीची टीम इंडियात निवड झाल्यापासून आमचे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले. हे काहींच्या डोळ्यात खूपत आहे. ते आमच्या कुटुंबाशी शत्रुत्वाच्या भावनेने वागत आहेत, चुकीचे आरोप आमच्यावर केले जात आहेत.
असे काय घडले की शमीच्या वडीलांना समोर येऊन सांगावे लागले
- पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी त्यांनी अमरोहा येथे एका गाय तस्कराला पकडले होते. यावेळी मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद हसीब काही सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला.
- पोलिस अधिकारी प्रदीप भारद्वाज यांनी सांगितले, की हासीबने गाय तस्कराला सोडवण्याचे प्रयत्न केले. यानंतर हसीब आणि भारद्वाज यांच्यात धरपकड झाली. दोघांनी एकमेकांना मारहाण केली. हसीबने अधिकाऱ्याचा गणवेश फाडला. या मारहाणीचा फायदा घेऊन तस्कर घटनास्थळावरुन फरार झाला.
- पोलिस अधिकारी भारद्वाज यांच्या तक्रारीवरुन हसीबसह दोन जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना मारहण आणि आरोपीला पळून जाण्यात मदत करण्याचा आरोप ठेवण्यात आला.
काय म्हणाले शमीचे वडील
- माझ्या मुलगा (हसीब) घटनेच्या वेळी तिथे नव्हता.
- तो फार वेळानंतर तिथे पोहोचला आणि तो केवळ गर्दीचा भाग होता.
- बळजबरीने त्याचे नाव या प्रकरणात गोवण्यात येत आहे.
- मी महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितले होते, की या मुद्द्यात (गोहत्या) आम्हाला गोवले जात आहे.
- हसीबला झालेली अटक हा त्याच षडयंत्राचा भाग आहे.
जिल्हाधिकारी काय म्हणाले
- माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, जिल्हाधिकारी वेद प्रकाश यांच्याकडून हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा त्यांनी सांगितले की तौसीफ एक महिन्यापूर्वी भेटले होते.
- तौसीफ यांनी सांगितले होते, की कोणी त्यांच्या कुटुंबाला फोनवरुन धमकावत आहे.
- तौसीफ यांनी धमकी देणाऱ्याचे नाव मात्र सांगितले नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शमीचे भाऊ आणि वडील