आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैरानावर भागवतांनी मौन सोडले, म्हणाले- देशात हिंदू विस्थापित होणे दुःखदायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी जोधपूर येथे झालेल्या हिंदू साम्राज्य दिवसाच्या निमीत्ताने या वादावर धारण केलेले मौन सोडले आहे. - Divya Marathi
रविवारी जोधपूर येथे झालेल्या हिंदू साम्राज्य दिवसाच्या निमीत्ताने या वादावर धारण केलेले मौन सोडले आहे.
जोधपूर - उत्तर प्रदेशातील कैराना येथे हिंदूंच्या कथित विस्थापनाच्या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात हिंदूंचे होत असलेले विस्थापन दुःखदायक असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर मौन धारण केलेल्या संघाने रविवारी जोधपूर येथे झालेल्या हिंदू साम्राज्य दिवसाच्या निमीत्ताने या वादावर धारण केलेले मौन सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संघांना हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला. त्यानिमीत्ताने जोधपूर येथे आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, राज्यांचे काम केवळ जनतेकडून कर वसूल करणे नाही तर, त्यांची आयुष्य सुखकर करणे आणि त्यांना प्रत्येक संकटात साथ देणे हेही आहे.

भागवत म्हणाले, 'लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे की हा देश माझा आहे, ही भूमी माझी आहे.' 43 मिनीटांच्या प्रवाही भाषणात भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी समाजातील अनेक वर्गांना एकत्र करुन काम केले, तेच काम आज संघ करत आहे.'

कैरानाचा थेट उल्लेख टाळला
- भागवतांनी त्यांच्या बौद्धिकात कैरानाच्या घटनेचा किंवा कैरानाचा थेट उल्लेख टाळला.
- ते म्हणाले, 'आज बांगलादेश आणि पाकिस्तान नाही तर भारतात अनेक ठिकाणी हिंदूंचे विस्थापन सुरु आहे. ही चिंताजनक स्थिती आहे.'
- 'देशातील काही भागांमधून विस्थापनाच्या बातम्या येत आहेत. त्या दुःखदायक आणि चिंता करायला लावणाऱ्या आहेत.'
- 'आमची जबाबदारी आहे की लोकांच्या मनातील निराशा दूर करुन हा देश आणि भूमी आपली आहे, हा विश्वास निर्माण केला गेला पाहिजे.'
- भागवतांनी सांगितले, की संघ 90 वर्षांपासून हा दिवस साजरा करत आहे, कारण या दिवशी शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याची स्थापना केली होती.
पुढील स्लाइडमध्ये, जोधपूर येथील हिंदू साम्राज्य दिनाचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)