आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुले जन्माला घाला, कुणी अडवले; सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदूंना अावाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत, असे आवाहन केले आहे. यामुळे नवा राजकीय वाद पेटला असून विशेषत: उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसप आणि काँग्रेसने भागवत यांच्या आडून मोदी-भाजपवर हल्लाबोल केला.

शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, “हिंदूंची लोकसंख्या वाढण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. इतर धर्मांत इतकी मुले जन्माला घातली जात असताना हिंदूंना कोणी रोखले आहे?’
भागवत सध्या आग्रा येथे असून चार दिवसांच्या मुक्कामात ते समाजातील विविध घटकांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या कमी होणाऱ्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर ते म्हणाले, सामाजिक परिस्थिती व वातावरण याला कारणीभूत आहे.
हिंदूंची लोकसंख्या वाढू नये असा कोणता कायदा सांगतो? इतरांची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंना यापासून कोणी अडवले आहे? दरम्यान, रविवारी सुमारे दोन हजार दाम्पत्यांसमोर बोलताना भागवत यांनी आपल्या मुलांमध्ये कौटुंबिक मूल्य आणि देशभक्तीच्या भावना जागृत कराव्यात, असे आवाहन केले.
मी भाजप सरकारचा दूत नाही : भागवत
आपल्या वक्तव्यावरून वाद पेटत चालला असल्याचे पाहून भागवत यांनी सरकार व भाजपशी आपला संबंध नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. रविवारी शिक्षकांनी आरक्षण व शिक्षण धोरणाविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘मी काही भाजप सरकारचा दूत नाही. याबाबत तुम्ही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाच विचारा.’
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी काय म्‍हणाले भागवत, काय म्‍हणाल्‍या मायावती..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...