आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohanlalganj Murder Forensic Report Disclose Gangrape

मोहनलालगंज प्रकरण : गैंगरेपनंतरच खून झाला, फॉरेन्सिक अहवालात झाले स्पष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मोहनलालगंजमध्ये घटनास्थळाची तपासणी करणारे पोलिस
लखनऊ - मोहनलालगंज रेप केसमध्ये पोलिसांना महिलेबरोबर बलात्कार झालाच नसल्याचा दावा केला होता. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये महिलेबरोबर रेप झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांच्या या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे डीएनए तपासणीमध्ये एकापेक्षा अधिक लोकांचे रक्त आणि चमड्याटे नमुणे आढळले आहेत. म्हणजेच या घटनेत एकापेक्षा अधिक लोकांचा समावेश असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही दिसून येत आहे. पोलिसांनी मात्र केवळ बलात्काराचा प्रयत्न झाला असून केवळ एका व्यक्तीचा गुन्ह्यात समावेश असल्याचे म्हटले होते.
महिलेच्या शरिरावर आढळले वीर्य
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुण्यामध्ये महिलेच्या शरिरावर पुरुषाचे वीर्यही आढळले आहे. तसेच महिलेच्या नखांमध्ये एकापेक्षा अधिक लोकांचे रक्त आणि चमडे आढळले आहे. त्यामुळे घटनेच्या वेळी अनेक जण उपस्थित असल्याचे स्पष्ट होते. एडीजी सुतापा सान्याल यांनी महिलेबरोबर रेप झाला नसल्याचा दावा केला होता. मात्र फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके काय ते स्पष्ट होणार असल्याचेही ते म्हणाले होते.

पुढे वाचा - काय आहे प्रकरण?