आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांशी थेट लढताहेत माओवा‌दी, झारखंड, बिहारात माओवा‌द्यांचे धैर्य वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - माओवादी झारखंड व शेजारी राज्य बिहारमध्ये पुन्हा आपला पाया मजबूत करण्याच्या प्रयत्न करत आहेत. लातेलहारच्या बुढा पहाडपासून बिहारमधील गया व आैरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील चक्रबांधापर्यंत कॉरिडॉर बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा कॉरिडॉर छत्तीसगडच्या बलरामपूर क्षेत्राशी निगडित आहे. या भागातील नक्षलवादी आता पोलिसांशी मुकाबला झाल्यावर पूर्वीसारखे पळून जात नाहीत, तर नेटाने मुकाबला करतात. कॉरिडॉर बनवण्यासाठी माओवादी या भागातील सुरक्षा दलांना लक्ष्य करू शकतात, केंद्र सरकारने हा विशेष इशारा जारी करून बिहार व झारखंडमधील पोलिस मुख्यालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
माओवद्यांची केंद्रीय समिती सुधाकरच्या नेतृत्वाखाली पोलिसांशी लढत आहे. पोलिसांशी चकमक झाल्यास सुधाकर स्वत: पुढे राहून माओवाद्यांचे मनोबल वाढवतो. पोलिसांनाही त्याच्या हालचालींची माहिती आहे. त्याला घेरण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
बिहारमध्ये गया जिल्ह्यात चक्राबांधामध्ये २१ जुलै रोजी बिहारच्या विभागीय समितीचा माओवादी नागेंद्र यादवला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून खुलाशानुसार बिहार-झारखंड स्पेशल एरिया कमिटीचा नेता संदीप यादवने हे काम केल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...