आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवानावर अल्पवयीन मुलीने लावला बलात्काराचा आरोप, लग्नाचे आमिष दाखवून केले हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव- येथील सेक्टर-5 मध्ये एका सैन्यातील जवानावर लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरूणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेची मेडिकल करून जबाब नोंदवला आहे. बिहार येथील लखीसराय येथील रहिवाशी पीडित तरूणी ही शीतला कॉलनीमध्ये कुटुंबासोबत राहत होती. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, शेजारी रूबी आणि तिचा पती धनंजय मिश्रा राहत होते, ती त्यांना भैया-भाभी म्हणत होती. एक दिवास रबीने पीडितेची ओळख सैन्यात जवान असलेला रविरंजन मिश्रा उर्फ सोनू याच्याशी करून दिली. जानेवारी 2016 पासून दोघांमध्ये बोलने सुरू झाले.


- पीडितेने सांगितले की, आरोपी मे 2016 मध्ये गुडगावला आला होता, तेव्हा तो रूबीकडे थांबला होता. रूबीने पीडितेला फोन करून घरी बोलवले. यानंतर ती काही कामानिमित्ताने बाजारात निघून गेली. पीडितेला एकटी पाहून रविरंजनने तिच्यावर जबरदस्ती केली. रूबी आणि तिचा पती घरी परतल्यानंतर त्यांना याविषयी कळाले, तेव्हा त्यांनी पीडितेलाच धमकावत याविषय़ी कोणाला काही सांगू नको, तुझे लग्न रविरंजनशी लावून देऊ असे म्हणत धमकावले. यानंतर आरोपीशी तिचे फोनवर बोलने सुरू झाले.

- पीडिते आरोप केला आहे की, जानेवारी 2017 मध्ये आरोपी गुडगाव येथे आला आणि तिला दिल्ली येथील आपल्या मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे तिच्यासोबत पून्हा शारीरिक संबंध बनवले. यानंतर पीडितेने रविरंजनकडे लग्नाचा अग्रह धरा तेव्हा त्याने वयाचे कारण देत तु 18 वर्षाची झाल्यावर करू असे सांगितले. आता आऱोपी रविरंजन 28 नोव्हेंबरला दुसऱ्या तरूणीशी लग्न करत आहे.
- चौकशी अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेचे मेडीकल आणि जबाब नोंदवण्यात आले आहे. चौकशीत कळाले की, आरपी सैन्यात काम करत आहे. ज्यावेळी पीडितेवर जबरदस्ती करण्यात आली, तेव्हा ती अल्पवयीन होती. त्यामुळे पाक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पुढील स्लाइडवर वाचा संपूर्ण घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...