आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Molestation With Kidnapped Minor Girl In Sonipat, Haryana

बलात्कारानंतर धर्म बदलून केला निकाह, मुल झाल्यानंतर लावले दुसरे लग्न; वाचा आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनीपत - हरियाणाच्या सोनीपत यथे नर्सरीमध्ये काम करणार्‍या एका अल्पवयीन मुलीला कैद करुन तिच्यासोबत दुष्कर्म करण्यात आले. त्यानंतर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करुन तिच्यासोबत लग्न करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतरही तिचे लैंगिक शोषण सूरुच होते. एवढेच नाही तर, आरोपीने दुसर्‍यांदा तिचा 'निकाह' लावून दिला. पीडित युवतीला आरोपीकडून पाच महिन्यांचा एक मुलगा देखील आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी सोनीपत पोलिसांनी मुख्य आरोपी मनीष उर्फ मुन्ना आणि त्याचा भाऊ नुरा याला अटक केली आहे. पोलिस स्टेशन प्रभारी दलबीर डांगी यांनी सांगितेल, की 18 वर्षीय पीडितेला जेव्हा मुन्ना सोबत घेऊन गेला होता तेव्हा ती अल्पवयीन होती. पीडिता ज्या नर्सरीमध्ये काम करत होती, तिथे मुन्ना नोकरीला होता. त्याचे पहिले एक लग्न झालेले असून तो चार मुलांचा पिता आहे.
पीडितेच्या आरोपानुसार, मुन्नाने हरियाणामधील बहादुरगड येथील एका धार्मिक स्थळी धर्म परिवर्तन केले आणि लग्न लावले. त्यानंतर पत्नीला घेऊन तो सहारनपूर येथे गेला आणि तिथे मित्रांना तिच्यावर बलात्कार करायला लावला. पीडित युवती हे मुळची उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील आहे. तिला आई-वडील नाहीत. तिचे वडील सोनीपत येथेच एका शाळेत काम करत होते.
पुढील स्लाइडमध्ये युवतीची आपबीती, अनेकांनी केला बलात्कार
छायाचित्र- या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे स्थानिक नागरिक.