आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतत BF सोबत पळून जात होती विवाहीत तरुणी, आई-सासऱ्याने केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- नौबस्ता येथे मगळवारी सतत प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या मुलीच्या वागण्याला कंटाळून आईने तिची गळादाबून हत्या केली. मुलगी आपल्या सासारी जाण्यास टाळाटाळ करत होती आणि प्रियकरासोबत पळूण गेली होती. काही दिवसांपूर्वीच मृत मुलीच्या आईने तिला पकडून आणले होते. मुलीच्या या पळून जाण्याच्या हरकतींना कंटाळून आईने हे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि मृत मुलीची आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
 
मुलीमुळे नातेवाईकात होत होती बदनामी...
- नौबस्ता पोलिसा ठाण्याच्या क्षेतातील खाडेपूर कॉलनी येथे राहणारे संतोष सिंह एक वर्षापूर्वी कमला देवी यांच्या घरी किरायाने राहण्यासाठी आले होते. त्याच्या कुटुंबात पत्नी मोना, मोठी मुलगी शक्ती (18), सपना (13), रुची (11) यांच्यासोबत राहत होते.
- 25 मार्च 2017 ला त्यांनी आपली मुलगी शक्तीचा विवाह कर्रहीमध्ये राहणाऱ्या सत्यनारायन यांचा मुलगा शिवमशी केला होता. माहितीनुसार, शक्तीचे आपल्या कॉलनीतील तन्नू नावाच्या मुलासोहत प्रेमसंबंध होते, यामुळे ती नेहमी माहेरी येत होती.
- मृत मुलीची आई मोना यांनी सांगितले, शक्ती 10 दिवसांपूर्वी सासरी भांडण करून माहेरी आली आणि प्रियकर तन्नूसोबत पळून गेली. त्यानंतर आम्ही तीचा शोध घेतला. दोन दिवसांपूर्वी तिला दिल्ली येथून पकडून आणले होते. यापूर्वीही ती अनेक वेळा पळून गेली होती. कसेतरी लपून तिचे लग्न लावून दिले होते. परंतु, या मुलीमुळे सर्व नातेवाईकांनी आम्हाला सोडून दिले होते आणि सर्वत्र आमची बदनामी झाली होती.

बहिणीचा सासरा आणि आईने मिळून केली हत्या...
आई मोनाने सांगितले की, शक्ति मंगळवारी पोलिसांत तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तिने म्हटले होते की, मला सासरी जायचे नाही, परंतु माझी आई मला जबरदस्ती सासरी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. यावर पोलिसांनी तू पूढे घरी चल आम्ही येतो असे सांगितले.
- तिच्या याच हरकतींमुळे मी तिची गळा दाबून हत्या केली असे आई मोनाने सांगितले.
- मृत मुलीच्या दोन्ही बहीनी सपना आणि रुचि यांनी सांगितले की, दीदी आईसोबत भांडण करत होती. त्याचवेळी दीदीचे सासरे सत्यनारायन हे आले, ते म्हणले तुमच्या मुलीने आमचे नाक कापले. यावरून दीदीचे आईसोबत आणि सासऱ्यासोबत मारहाण सूरू झाली. सत्यनारायण यांनी दीदीचे पाय धरले आणि आईने तिचा गळा दाबला, त्यानंतर सत्यनारायन पळून गेला.

पोलिस काय म्हणातात...?
सीओ जनार्धन दूबे यांनी सांगितले की, एका तरूणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मृत मुलीची आई आणि पतिला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाची तापस करण्यात येत असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल.

पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी निगडीत फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...