आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी-माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर आला नोटांनी भरलेला बॉक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाच तो नोटांनी भरलेला बॉक्स, जो कोणासाठी आला याचा तपास करण्याची गरज असल्याचे नेते म्हणत आहेत. ज - Divya Marathi
हाच तो नोटांनी भरलेला बॉक्स, जो कोणासाठी आला याचा तपास करण्याची गरज असल्याचे नेते म्हणत आहेत. ज
मेरठ (उत्तर प्रदेश) - मेरठ येथील शासकीय विश्रामगृहात एका काळ्या एसयूव्हीमधून नोटांनी भरलेले मोठो खोके आणण्यात आले. ते पैसे कोणासाठी आणले गेले होते, किंवा ते कोणाचे पैस होते याचा तपास लागलेला नाही. मात्र त्यावेळी राज्याचे आजी - माजी मंत्री विश्रामगृहात हजर होते आणि पंतजलिच्या कार्टूनमधून या नोटा आणण्यात आल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.
मेरठच्या विश्रामगृहातील रुम क्रमांक दोनमध्ये उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री शाहिद मंजूर यांची मिटींग सुरु होती, तर त्याच रुमच्या शेजारी बहुजन समाज पक्षाचे नेते माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी थांबलेले होते. त्यावेळी नोटांनी भरलेला एक मोठा बॉक्स आत नेला जात होता. शुक्रवारी घडलेल्या या घटनेवेळी नोटांनी भरलेल्या बॉक्ससोबत कँट मतदारसंघातील बसपचे दावेदार शैलेंद्र चौधरी देखील होते. आगामी विधानसभा निवडणुकीतील तिकीट खरेदी-विक्रीसाठी पैशांनी भरलेला हा बॉक्स असल्याची राज्याच्या राजकीय वर्तूळात चर्चा सुरु आहे. हा बॉक्स बसप नेत्यांचा असल्याचा आरोप होत आहे, मात्र अद्याप ते स्पष्ट झालेले नाही.
मंत्री म्हणाले, नोटा कुणाच्या याचा तपास होईल
कॅबिनेट मंत्री शाहिद मंजूर म्हणाले, की विश्रामगृहावर नोटांनी भरलेला बॉक्स कोणी मागवला होता, याचा तपास होण्याची गरज आहे. बसप नेते सिद्दीकी म्हणाले, की पैसे घेऊन येणारे लोक कोण होते याची माहिती नाही. विश्रामगृह काही माझे घर नसल्याचेही, ते म्हणाले. तर, उत्तर प्रदेश पोलिसांनी या सर्व प्रकरणावरच पडदा टाकण्याचा प्रयत्न करत, नोटांनी भरलेला बॉक्स विश्रामगृहावर आल्याची माहिती नसल्याचे सांगितले.
विश्रामगृहाच्या रुम क्रमांक दोन येथे राज्याचे मंत्री मंजूर यांची बैठक होती. बैठक संपल्यानंतर ते रोजा इफ्तारसाठी निघून गेले. त्यांच्या समोरच्याच रुममध्ये बसप नेते सिद्दीकी थांबलेले होते. त्याच दरम्यान महिंद्रा एसयूव्ही 14 एफ 4000 क्रमांकांची गाडी मंजूर यांच्या गाडीजवळ येऊन उभी राहिली. काही लोकांनी गाडीतून एक मोठा बॉक्स काढला आणि विश्रामगृहात घेऊन जाऊ लागले. बॉक्सचा वरचा थोडा भाग फाटलेला असल्याने आत काय आहे ते बरोबर कळाले. तिथे उभ्या असलेल्या फोटग्राफरची त्याच्यावर नजर पडली. त्याने नोटांनी भरलेला बॉक्स कॅमेरात कैद केला. बॉक्सचे फोटो काढल्याचे लक्षात आल्यानंतर नोटांनी भरलेला बॉक्स घेऊन आलेले लोक आल्या पावली परत गेले.
बसप नेते म्हणाले - पैसे कोणाचे, मला माहिती नाही?
बसप नेते शैलेंद्र चौधरी म्हणाले, बॉक्समध्ये कोणासाठी पैसै आले होते, याची कल्पना नाही. जेव्हा गोंधळ सुरु झाला तेव्हा आवाज ऐकून मी बाहेर आलो होतो. तोपर्यंत बॉक्स घेऊन येणारे लोक महिंद्रा एसयूव्ही मधून पसार झाले होते. मात्र, नोटा ज्या बॉक्समध्ये होत्या तो पंतजलिचा असल्याने या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे चौधरींनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित इतर छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...