आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी हक्क उल्लंघनाचा आरोप फेटाळला, माकडाचे पिल्लू उपचाराअभावी दगावल्याने जयपूरच्या महिलेची कोर्टात धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - माकडाच्या पिलाचा मृत्यू झाल्याने स्वत:च्या मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून एका महिलेने ११ महिने मानवाधिकार आयोगात न्यायासाठी लढा दिला. मात्र, यात तिला अपयश आले. राजस्थान राज्य मानवाधिकार आयोगाने महिलेचा युक्तिवाद फेटाळून लावला. माकडाच्या पिलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नसल्याने त्या पिलाच्या उपचारात निष्काळजीपणा झाला हे सिद्ध करता येत नाही आणि त्यामुळे महिलेच्या मानवी हक्काचे उल्लंघन झाले, असे म्हणता येणार नाही.

हा रंजक खटला आयोगात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आला होता. आबू रस्त्यावरील एका वसाहतीत गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी एका कुत्र्याने माकडाच्या पिलाचा चावा घेतला. चांदनी खंडेलवाल हिने त्या पिलाला पशुचिकित्सालयात नेले. तेथे तत्कालीन पशुचिकित्सक डाॅ. अमित साही जागेवर नव्हते. त्या महिलेने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याची इच्छा व्यक्त केली. शेवटी कर्मचारी लेखराज, किशन आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्या छोट्या पिलावर उपचार केले. त्याला दवाखान्यात पुढील निगराणीसाठी दाखल करून घेण्याऐवजी तो बरा झाला, असे सांगून त्याला घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

त्या महिलेने आयोगास सांगितले : उपचारात निष्काळजीपणा झाल्याने पिलाचा मृत्यू झाला. त्यामुळे वादीच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. आयोगाने पशुपालन विभागाकडून यासंबंधीचा अहवाल मागवला. उपचारात निष्काळजीपणा झालेला नाही, असे नमूद करण्यात आले. आयोगाचे अध्यक्ष न्या. प्रकाश टाटिया यांनी सांगितले, पुराव्यावरून महिलेच्या मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याचे कोठेही दिसून येत नाही.

शवविच्छेदन करण्यापूर्वीच माकडे त्या पिलाचा मृतदेह जंगलात घेऊन झाली पसार
महिलेने मानवधिकार आयोगास सांगितले : रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे पिलाचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन ती सिरोहीला चालली होती. आबूच्या डोंगरात एका ठिकाणी त्या सहकाऱ्यास थांबल्या होत्या. तेव्हा माकडांच्या कळपाने त्या पिलाला पळवले. औषधी असूनही तेथील एका अन्य डॉक्टरांनी उपचार केला नाही, म्हणून मानवी हक्काचे उल्लंघन झाले.
बातम्या आणखी आहेत...