आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाअखेरीस तेलंगणाचा निर्णय, दिग्विजयसिंह यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - काँग्रेस कार्यकारिणीच्या महिनाअखेरीस होणा-या बैठकीत वेगळ्या तेलंगणा राज्य निर्मितीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. पक्षाचे आंध्र प्रदेश प्रभारी दिग्विजयसिंह यांनी शनिवारी ही माहिती दिली.


काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आता चर्चा नाही, निर्णयच होऊ शकेल. दिल्लीत शुक्रवारी याच मुद्द्यावर काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मात्र यात तेलंगणाचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीकडे सोपवण्यात आला, असे दिग्विजय म्हणाले.


काँग्रेसमध्येच एकमत नाही
बाजूने : तेलंगणातील नेत्यांची बैठक केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांच्या निवासस्थानी झाली. एका मंत्र्याने सांगितले की, तेलंगणावर हायकमांड अनुकूल आहेत. केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल.
विरोधात : रायलसीमा भागातील एका मंत्र्याच्या मते, थेट निर्णय घ्यावयाचा असेल तर केंद्रीय कार्यकारिणीने राज्य पुनर्रचनेसाठी दुसरा आयोग नेमावा. तसा प्रस्ताव कार्यकारिणीने 2004 मध्येच मान्य केला होता.