आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू : 300 फूट खोल दरीत बस कोसळली, 23 हून अधिक ठार झाल्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उधमपूर/जम्मू - जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे 23 हून अधिक लोक ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. लट्टी परिसरातील 300 फूट खोल दरीत ही बस कोसळली अाहे. घटनेनंतर अपघात स्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत कार्याला वेग आणला. त्याआधी स्थानिकांनी याठिकाणी अपघातग्रस्तांची मदत करण्याचा प्रयत्न केला. जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपायुक्त यशा मुछगल म्हणाले की, लाटी परिसरात एक बस सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळली. त्यात जवळपास 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींची संख्या 35 असल्याचे सांगितले जात आहे. 20 जखमींना सुधमादेव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांसह अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

ओव्हरलोड असल्याने झाला अपघात
एसडीओपी विनोद कुमार यांना दिलेल्या माहितीनुसार या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे वळणाजवळ या बसला अपघात झाला. अपघातातील जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यात 6 गंभीर आहेत. सोमवारी सकाळी जेके 02 एई 2858 क्रमांकाची बस डूडुहून उधमपूरला चालली होती. सुमारे सव्वा अकरा वाजता जेव्हा बस लाटी परिसरात पोहोचली त्यावेळी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. बसमध्ये बसलेल्या सर्वांना लवकरात लवकर रुग्णालयांत दाखल करण्यात आले. बसमधून बाहेर काढले त्यावेळीच 23 जणांचा मृत्यू झालेला होता. तर काही जखमी बराच वेळ अडकलेले होते. दुर्गम भागात हा अपघात झाल्याने बचावकार्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.