आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवस बँका बंद : वाढू शकते कॅशची अडचण, बँकर्स म्हणाले पुरेशी कॅश असल्याचा दावा चुकीचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकांना शनिवारपासून सोमवारपर्यंत सुट्टी आहे. - Divya Marathi
बँकांना शनिवारपासून सोमवारपर्यंत सुट्टी आहे.
नवी दिल्ली - आजपासून म्हणजे शनिवारपासून सोमवारपर्यंतक बँका बंद राहणार आहेत. पण तीन दिवसांनंतर जेव्हा बँका उघडतील तेव्हा मोठी गर्दी पडणार असल्याची भिची बँकर्स व्यक्त करत आहे. बहुतांश ठिकाणी नोटबंदीला महिना उलटूनही अडचणी कायम आहेत. लोकांना बँकांमधून किंवा एटीएममधूनही नोटा मिळत नाहीत. अनेक बँकर्सने सांगितले की, सरकार आणि रिझर्व्ह बँक वारंवार पैसे असल्याचे सांगत आहे. पण खरं म्हणजे करंसी चेस्टमध्ये फार कमी नोटा मिळत आहेत. ते म्हणाले की, दोन आठवड्यांपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

95% एटीएम रिकैलिब्रेट तरीही अडचणी
- एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील 95 टक्के एटीएम रिकॅलिब्रेट करण्यात आले आहेत. पण तरीही लॉजिस्टिक्समुळे कॅशच्या अडचणी कायम आहेत. एटीएममध्ये दिवसातून केवळ एकदा पैसे भरले जात आहेत.
- रिझर्व्ह बँकेने चेकबूक किंवा विड्रॉवलद्वारे आठवड्याला 24,000 रुपये काढण्याची सीमा ठेवली आहे. पण कॅशच्या कमतरतेमुळे अनेक साखांमध्ये 2000 रुपयेच दिले जात आहेत. त्यात ग्राहक बँकांकडे नुकसान भरपाईही मागत आहेत. बँका ज्याप्रमाणे मिनिमम बॅलेन्स नसल्याने दंड ठोठावतात त्याप्रमाणे ही मागणी आहे.

आरबीआयकडून दिशाभूल..
- ऑल इंडिया बँक एम्प्लॉई ऑर्गनायझेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काळ्या पैशाच्या विरोधातील लडा चांगला आहे. पण नोटबंदीनंतर बँका आणि एटीएममध्ये कॅश नसणेही योग्य नाही.
- आरबीआय पुरेशी कॅश असल्याचे सांगते. पण तसे होत नाही. त्यामुळे लोकांचा आमच्यावर राग निघतो.
- असा स्थितीत बँकेकडून दिशाभूल केल्यासारखे वाटत आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...