आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम रहीमचा फरार साथिदार पवन इंसां पोलिसांच्या ताब्यात, पंचकूला दंग्यानंतर 88 दिवसांनी अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवन इंसां - Divya Marathi
पवन इंसां

पानीपत- साध्वीचे लैंगिक शोषण प्रकरणात जेलमध्ये 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहीम याचा अतिशय जवळचा समजल्या जाणारा पवन इंसां याला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. सोमवरी एसआयटीने पवन इंसांला पंजाबच्या लालडू येथून ताब्यात घेतले. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी वाढवली होती. इंसाला हा हरियाणा पोलिसांनी मोस्ट वांटेल घोषित केले होते. त्याचा एक अन्य साथिदार आदित्य इंसां हा अद्याप फरार आहे.


25 ऑगस्टपासून फरार होता इंसां....
- 25 ऑगस्टला पंचकूला कोर्टाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवले तेव्हा हरियानामध्ये अनेक ठिकाणी दंगे भडकवण्यात आले होते. या प्रकरणी आरोपी असलेले पवन इंसां, आदित्य इंसां आणि हनीप्रीत हे फरार झाले होते.
- हनीप्रीतला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पवन इंसांला  देखिल पोलिसांनी अटक केली आहे.


व्हाट्सअॅप कॉलिंगद्वारे हनीप्रीतच्या संपर्कात होता पवन...
- पवन इंसां, आदित्य इंसां आणि हनीप्रीत तीघेही व्हाट्सअॅप कॉलिंगद्वारे एकमेकांशी संपर्क करत होते.
- हनीप्रीतला पकडल्यानंतर तिने यासंदर्भात खुलासा केला होता.


अंबाला जेलमध्ये कैद आहे हनीप्रीत...
- पोलिसांनी अटक केल्यानंतर हनीप्रीतला रिमांडवर घेऊन चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. सध्या ती अंबाला जेलमध्ये कैद आहे.


पाच राज्यामध्ये झाले होते दंगे...
- साध्वीवरील बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहीमला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हरियाना, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दंगे भडवण्यात आले होते.
- या हिंसेमध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 300 पेक्षा आधिक लोक जखमी झाले होते. तसेच, कोट्यावधीच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.
- पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने डेरा सच्चा सौदाकडून हिंसेत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात येईल असे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...