आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला दूध पाजत होती आई, मुलीला लागला करंट, सोडवण्याच्या प्रयत्नात तिघेही दगावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंडौन सिटी (राजस्थान)- गोरक्षनाथ कॉलनीत कूलरचा करंट लागल्याने आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला दीड वर्षीय मुलाला दूध पाजत होती. तेव्हा तिच्या तीन वर्षीय मुलीने कूलरला हात लावला. तिला जोरदार करंट बसला. मुलीला सोडवण्याच्या प्रयत्नात महिला आणि चिमुरड्याचाही करंंट लागून जागीच मृत्यू झाला.

कसा घडली ही दुर्घटना?
- कैलाश नगरातील गोरक्षनाथ कॉलनीत राहाणारा वेदप्रकाश जोगी मंंडीत मोलमजुरी करतो. सोमवारी तो सकाळी कामाला गेला. मुलगा नीतेश शाळेेत गेला होता.
- पत्नी ओमवती (25), मुलगी काजल (3) आणि दीड वर्षाचा मुलगा प्रियांशु घरी होते.
- ओमवती प्रियांशुला दूध पााजत होती. तितक्यात खोलीतून आलेल्या काजलने कूलरला हात लावताच तिला कुलरचा जोरदार करंंट लागला. ती वेेदनेने विव्हळत असताना ओमवती तिला वाचवण्यासाठी धावली. तेव्हा प्रियांशु हा देखील तिच्या कुशीत होता. ओमवतीसह प्रियांशूलाही करंंट बसला आणि तिघांंचा जागेवरच मृत्यू झाला.
मुलगा शाळेेतून घरी आल्यानंतर समजली घटना...
- शाळेेत गेलेला नीतेश घरी आल्यानंतर त्याला घरात आई, बहीण आणि भावाचा मृतदेह दिसला.
- नीतेश घराबाहेर येऊन रडूू लागला.
- ओमवतीची आजल सासू दक्खो देवी नीतेशजवळ आली आणि घरात जाऊन ओमवतीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, दक्खो देवीलाही वीजेचा करंट बसला. ती जोरात ओरडताच शेजारी राहाणारे लोक घरात आले. त्यांनी मीटरची वायर कापूून विद्यूत पुरवठा खंंडीत केला.
- ओमवती, काजल आणि प्रियांंशूूला तातडीने हॉस्पिटलला हलवले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांंनी तिघांंना मृत घोषित केले.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेेशी संंबंंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...