आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडे 5 महिन्यांच्या बाळाला केले हायकोर्टात हजर, \'बाबा\'ला दत्तक देण्यावर स्थगिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साडेपाच महिन्यांचे बालक घेऊन कोर्टात जाणारी त्याची आई. - Divya Marathi
साडेपाच महिन्यांचे बालक घेऊन कोर्टात जाणारी त्याची आई.
जयपूर - साडेपाच महिन्यांच्या एका बालकाला त्याच्या आई-वडिलांनी एका बाबाच्या स्वाधीन केले होते. कोर्टाने या प्रकरणी 23 जुलै रोजी झालेल्या दत्तक विधानाला शनिवारी स्थगिती दिली आहे. बालक त्याच्या आई-वडिलांकडेच राहील आणि त्याच्या आजी-आजोबांना त्याला भेटता येईल असा आदेश शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधिश बेला एम त्रिवेदी यांनी दिला आहे.
आई-वडिलांनी बालकाला बाबाच्या स्वाधीन केल्यानंतर बालकाच्या आजोबांनी त्याची कस्टडी मिळावी यासाठी कोर्टाचे दार ठोठावले. बालकाच्या आई-वडिलांवर आरोप आहे, की त्यांनी बाबाच्या अब्जावधीच्या संपत्तीचा वारस करण्यासाठी त्याला बाबाच्या हवाली केले आहे. तर, आजोबांचा दावा आहे, की बाबा तंत्र-मंत्र विद्येत पारंगत आहे, तो माझ्या नातवाचा नरबळी देण्यासाठी वापर करु शकतो. या प्रकरणावर शनिवारी कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने दत्तक विधानाला स्थगिती दिली.

काय आहे प्रकरण
राजस्थानच्या अजमेर येथे राहाणाऱ्या एका सुखवस्तू जोडप्याने 23 जुलै रोजी त्यांच्या दोन मुलांपैकी साडे पाच महिन्यांच्या एका मुलाला खंडवा येथील बाबा रामदयाल याला सुपुर्द केले. बालकाची आई डॉ.पूजा प्राध्यापक आहे, तर वडिल पवन बिल्डर. रामदयालचा खंडवा येथे आश्रम आहे. त्याचे अनुयायी त्याला छोटे सरकार नावाने ओळखतात. बाबा म्हणून ख्याती मिळण्याआधी तो इंजिनअर होता, अशी माहिती आहे. रामदयालचे म्हणणे आहे, माझ्या अब्जावधीच्या संपत्तीला वारस नाही. जर हे बालक मिळाले नसते तर ही संपत्ती कोणाच्या हवाली करायची असा प्रश्न पडला असता. डॉ. पूजा आणि तिच्या पतीने मुलाचे नाव मुल्कराज ठेवले होते. मुलगा बाबाच्या ताब्यात आल्यानंतर त्याने त्याचे नाव बदलून अनंतदयाल ठेवले आहे. पवन आणि पूजा यांना आणखी एक मुलगा आहे. आठ वर्षांचा हा मुलगा त्यांच्याकडे राहातो.
प्रकरण कोर्टात का गेले ?
सीआरपीएफ निवृत्त बालकाचे आजोबा राजेंद्र पुरोहित यांनी बालकाच्या कस्टडीची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे, की बाबाला तंत्र-मंत्र विद्या अवगत आहे. तो त्याचा प्रयोग मुलावर करु शकतो. त्यांना भीती आहे, की रामदयाल बालकाचा नरबळी देऊ शकतो. त्यांचे म्हणणे आहे, की मी माझ्या नातवाला घेण्यासाठी गेलो होतो, मात्र रामदयालच्या लोकांनी मला धमकावून तेथून काढून दिले. राजेंद्र पुरोहित यांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे, की रामदयालचे लग्न झालेले नाही. असा माणूस मुलाला दत्तक कसा घेऊ शकतो?
शुक्रवारी कोर्टात काय झाले ?
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने प्रश्न उपस्थित केला, 'एखादे आई-वडिल त्यांचा साडे पाच महिन्यांचा मुलगा कसा काय एखाद्या बाबाच्या ओंजळीत टाकू शकतात?' त्यानंतर बालकाला कोर्टात हजर करण्याचा आदेश देण्यात आला. कोर्टाच्या म्हणण्यानूसार, बालकाने कोणासोबत राहायचे हे ठरविण्याची समज अजून बालकात नाही. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. कोर्टाने या प्रकरणी शनिवारी पुन्हा सुनावणी होईल असे सांगितले.
आई-वडिलांची बाजू
मुलाच्या आई-वडिलांच्या वतीने त्यांचे वकील हेमंत नाहाटा म्हणाले, रामदयाल एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. ते बालकाचा योग्य सांभाळ करतील. त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणार आहेत. ते त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवतील. आई-वडिलांची बाजू मांडणारे दुसरे वकील अमित पारिख म्हणाले, मुलाला दत्तक देण्याची पद्धत कायदेशिर आहे. त्यात त्रूटी नाही.
कायदा काय सांगतो
ज्येष्ठ विधिज्ञ ए.के.जैन यांच्या म्हणण्यानूसार, हिंदू दत्तक कायद्यात मुलगा दत्तक देण्याची पद्धत आहे. परंतू काही गोष्टी परंपरेनूसार देखील होतात. मात्र आजपर्यंत एखाद्या आईने एखाद्या बाबाला मुलगा दत्तक देण्याचे प्रकरण समोर आलेले नाही. कायद्यानूसार, आईच्या इच्छेविरुद्ध मुलाला अशा व्यक्तीकडे सुपुर्द केले जाऊ शकते जिथे त्याचे अधिकार सुरक्षीत राहातील.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबाला दत्तक दिलेले पाच महिन्यांचे बालक
बातम्या आणखी आहेत...