आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण बेदी यांनी ट्विट करून शेअर केला नरेंद्र मोदींच्या आईचा फेक VIDEO, लोकांनी केले ट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पूर्ण देशभरात दिवाळीची धूम आहे. एकीकडे जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासह दिवाळी साजरी केली, तिथे दुसरीकडे त्यांच्या आईंनी आपल्या घरी दिवाळीची पूजा केली. त्यांनी या वेळी गुजराती लोकगीतावर गरबाही केला. हा व्हिडिओ पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केला. परंतु तो फेक असल्याचे ट्विटर युजर्सनी लक्षात आणून दिल्यानंतर किरण बेदी यांनी माफी मागिली. म्हणाल्या की, मला चुकीची माहिती देण्यात आली होती. परंतु त्या कुणी असतील त्यांच्या उत्साहाला मी सलाम करते. 
 
किरण बेदी यांचे ट्विट
किरण बेदी यांनी लिहिले की, "97 वर्षे वयात दिवाळीचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. या नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन आहेत. त्या आपल्या घरी दिवाळी साजरी करत आहेत."
- तथापि, याआधीही मीडियाला त्या खूप सहज सामोरे गेलेल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच त्या पारंपरिक गुजराती गरबा करताना दिसत आहेत.
 
जुन्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या होत्या...
- पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली होती तेव्हा बँकेत मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. याच रांगेत 97 वर्षीय हिराबेनही उभ्या राहिल्या होत्या. त्या सकाळी बँकेत पोहोचल्या तेव्हा त्याच्यासह त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी 4,500 रुपये मूल्याच्या जुन्या नोटा बदलून तेवढ्याच मूल्याच्या नव्या नोटा घेतल्या. पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन बँकेत आलेल्या हिराबेन यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून फॉर्म भरला, त्यावर अंगठ्याचा ठसा उमटवला आणि आपले पैसे बदलले.

जेव्हा पंतप्रधान निवासात पहिल्यांदा भेटल्या मुलाला...
- पीएम नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी पहिल्यांदा त्यांची भेट पंतप्रधान निवास 7RCR येथे घेतली. मोदींनी त्यांच्यासह चांगला वेळ घालवला, तसेच त्यांना पंतप्रधान निवासाची सैरही करवली. मोदींनी आईशी भेटीचे फोटोज ट्विटरवरही शेअर केले होते. मोदींनी लिहिले होते, माझी आई गुजरातेत परतली. त्या पहिल्यांदाच आरसीआरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासह मी चांगला वेळ घालवू शकलो.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...