आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर-भावजयीने एकाच दोरीने घेतला गळफास, विवाहितेची मुले धायमोकलून रडत होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीर-भावजयीने असा एकाच दोरीने गळफास घेतला. - Divya Marathi
दीर-भावजयीने असा एकाच दोरीने गळफास घेतला.
बालोद - येथे गावातील एका फार्म हाऊसमध्ये मंगळवारी सकाळी आंब्याच्या झाडाला एक तरुण आणि एका विवाहितेने गळफास घेतल्याचे पाहून खळबळ माजली. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाला फासावरून उतरवले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. घटनास्थळी कुंकवाची पुडी आणि जमिनीवर फुले पडलेली आढळली. मृत तरुण हा मृत विवाहितेचा नात्याने दूरचा दीर लागत होता. त्यांचे प्रेमसंबंध होते असे स्थानिक सांगतात.
 
असे आहे प्रकरण
- ही घटना पलारी गावातील आहे. नारायण साहू यांचे लग्न 16 वर्षांपूर्वी अंजनी साहू यांच्याशी झाले होते.
- सर्वकाही ठीकठाक सुरू होते. अंजनीला एक मुलगी आणि एक मुलगा झाला. सध्या मुलगी 15 वर्षांची, तर मुलगा 7 वर्षांचा आहे.
- 5 वर्षांपूर्वी अंजनीच्या आयुष्यात गावातलाच दूरच्या नात्याने दीर लागत असलेला लक्ष्मीकांत साहू आला. हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलत गेले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
- याचा अंदाज अंजनीच्या पतीला नव्हता, पण गावात चर्चा होऊ लागल्या. दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की, एकमेकांना सोडून राहूच शकत नव्हते.
 
हे घडले कारण
- मागच्या अनेक दिवसांपासून अंजनीवर पतीची नजर होती. यामुळे घरातील वातावरण बिघडले होते.
- घटनेच्या 3 दिवसांपूर्वीच या प्रकरणावरून अंजनी आणि तिच्या नवऱ्यात मोठा वाद झाला. यानंतर हे प्रकरण समाजातील लोकांपुढे गेले.
- शनिवारी बैठक बोलावण्यात आली होती आणि अंजनीला खूप समजावण्यात आले होते. त्या वेळी ती मानली आणि प्रियकराला सोडते म्हणून पतीसोबत पुन्हा नांदायला लागली.
- यानंतर मात्र या प्रेमीयुगुलाने जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. एका फासावर दोघे झाडाला लटकले.
- सकाळी काही गावकऱ्यांनी पाहिले आणि गावात एकच हलकल्लोळ उडाला. पाहता-पाहता घटनास्थळी भलीमोठी गर्दी जमा झाली.
 
दोघांनी लिहून ठेवली चिठ्ठी
- या घटनेनंतर पोलिसांनी शोध घेतला असता मृत लक्ष्मीकांतच्या खिशात सुसाइड नोट आढळली. त्यात लिहिले होते की, तो आणि त्याची प्रेयसी अंजनी जग सोडून चालले आहेत.
- इकडे अंजनीनेही आपल्या घरी सुसाइड नोट सोडल्याचे आढळले. तिने लिहिले होते की, जीवनाला कंटाळून मी जीव देत आहे.
- मृत अंजनीला दोन मुले आहेत. त्यांचा आक्रोश पाहून सर्वांची मने सुन्न झाली होती.
फोटो: अजय देवांगन
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...