आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरा: गरीबीला कंटाळून आदिवासी महिलेने पोटच्या मुलाला 200 रुपयांत विकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अगरतला- गरीबीला कंटाळून एका आदिवासी महिलेने पोटच्या मुलाला अवघ्या 200 रुपयांत विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्रिपुरा राज्यातील ढलाई ‍जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, याआधी याच राज्यात 11 दिवसांच्या एका मुलाला 7600 रुपयांत विकल्याची घटना समोर आली होती. त्रिपुरा राज्यात डाव्यांचे सरकार असून आगामी आठ महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

लवकरच सत्य समोर येईल- जिल्हाधिकारी
- न्यूज एजन्सी यूएनआयनुसार, जिल्हाधिकारी विकास सिंह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच सत्य समोर येईल, असाही दावा विकास सिंह यांनी केला आहे.  
- ढलाई जिल्ह्यातील गंधशेरा भागातील उल्तचेरा गावात ही घटना घडली आहे. रुनबती रियांग असे या महिलेचे नाव असून तिने गरीबीला कंटाळून पोटच्या मुलाला अवघ्या 200 रुपयांत विकले.

न‍ विचारताच मुलाला विकले- पती
- पत्नीने आपल्याला न विचारता सुनिजयला विकल्याचे खन्जय रियांग (रुनबतीचा पती) याने सांगितले आहे. लखीपूरमधील मकुंभिरपरा येथील धन्साई रियांग याला 13 एप्रिल रोजी रुनबती हिने 200 रुपयांत मुलाला विकले. आम्ही हलाखीचे जीवन जगत आहोत. मुलभूत सुविधांपासूनही आम्ही वंचित आहोत. मात्र, पत्नीच्या कृत्याने प्रचंड दु:ख झाल्याचे खन्जय याने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...