एकापाठोपाठ मुली होत असल्यामुळे एका आईने आपल्या दोन मुलींना दुधाच्या बाटलीतून अॅसिड पासून ठार मारले. तसे त्यानंतर तिने स्वतः देखिल आत्महत्या केली. या महिलेला आणखी दोन मुली होत्या, पण घटना घडली तेव्हा त्या घरात नव्हत्या त्यामुळे त्यांचे प्राण बचावले.
अमरेली जिल्ह्याच्या छतरिया गांवातील ही घटना आहे. पोलिस चौकशीत महिलेच्या पतीने सांगितले की, त्यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. दोन मुलींनंतर लाभूबेन (त्याची पत्नी) हिला मुलगा हवा होता. पण तिला तिसरी मुलगीच झाली होती. त्यानंतर ती चांगलीच नैराश्यात राहू लागली होती. तीन महिन्यांपूर्वीच तिला चौथी मुलगी झाली होती. त्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती.
दुधाच्या बाटलीत अॅसिड...
घटनास्थळी पोलिसांना एक दुधाची बाटली भेटली. त्यामध्ये अॅसिड भरलेले होते. लाभूबेनने दुधाच्या बाटलीत अॅसिड भरून आधी दोन्ही मुलींना पाजले आणि नंतर स्वतःदेखिल अॅसिड प्यायली. त्यानंतर दोन्ही मुलींचा जागीच जीव गेला. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिनेही प्राण सोडले.
ती बुधवारी सकाळीच तीन महिने माहेरी राहिल्यानंतर घरी परतली होती. सायंकाळी जेव्हा तिने तीन महिने आणि सात वर्ष वयाच्या दोन मुलींना अॅसिड पाजले, त्यावेळी तिचा नवरा कामावर गेलेला होता. तर त्यांच्या इतर दोन मुली आजोबाबरोबर बाहेर गेल्याने बचावल्या.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...