आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवस केले तरी मुलगीच झाली, 4 महिन्यांच्या चिमुरडीचा आईने चिरला गळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानमधील 4 महिन्याच्या मुलीच्या मर्डर केसमध्ये नवा खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येची आरोपी तिची आई नेहाने शुक्रवारी पोलिस चौकशीत कबूल केले की हत्येच्या 7 दिवसआधीही तिने बाळाच्या तोंडावर उशी ठेवून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचेवेळी कोणी तरी तिथे येत असल्याची चाहूल लागली आणि मुलीला सोडून दिले. आईच्या या कृत्याने मुलीचे शरीर निळे पडेल्यानंतर कुटुंबीयांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे 7 दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. 25 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमधून मुलीला डिस्चार्ज मिळाला होता. नेहाला मुलगा हवा होता. नवस, हवन केल्यानंतरही मुलगी झाल्याने तिने हे पाऊल उचलले.
कशी केली मुलीची हत्या
- मुलगी हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, अर्थात 26 ऑगस्टला नेहाने चिमुरडीची गळा चिरून हत्या केली.
- आईने स्वतःच्या मुलीच्या गळ्यावर तीन वार केले. रक्ताने माखलेला चाकूही त्या निर्दयी मातेने तिच्या गळ्यालाच पुसून साफ केला. त्यामुळे लहानगीच्या गळ्यावर 13 छोटे-छोटे घाव होते.
- हत्येनंतर नेहाने चाकू आणि स्वतःचे हात बाथरूममध्ये धुतले. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावावी हेही तिने आधीच ठरवून ठेवले होते. त्यानुसार एसीमध्ये मृतदेह लपवून ठेवला. एवढे सगळे करुन नेहा बेडरुममध्ये येऊन झोपली.
- नेहाला अटक झाली असून कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी नेहाने मुलीच्या गळ्यावर चालवलेला चाकूही जप्त केला आहे.

कसा झाला खुलासा
- ह्रदय हेलावून टाकणारी ही घटना राजस्थानमधील डाळ व्यापारी मंडळाचे अध्यक्ष बाबूलाल गोयल यांच्या घरात घडली. 25 ऑगस्टला नेहाची मुलगी हरवल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
- या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसला, जेव्हा मुलीचा शोध घेत-घेत ते तिची हत्या झाल्याच्या निष्कर्षापर्यंत आले आणि तपास तिची आई नेहाजवळ येऊन थांबला तेव्हा.
- पोलिसांचा पहिला संशय घरकाम करणाऱ्या चार नोकरांवर होता. तिची आई सगळ्यात शेवटी होती.
- मात्र जेव्हा हत्येची एक-एक कडी जोडत पोलिस सलग 13 दिवस तपास करु लागले, तेव्हा सगळे पुरावे नेहा गोयलकडे बोट दाखवत होते. हायप्रोफाइल कुटुंबातील प्रकरण असल्याने पोलिसांना प्रत्येक पुरावा अनेकदा तपासला होता.
- पोलिस चौकशीत तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली प्रत्येकाची चौकशी, दुसरी एफएसएल तपासणी आणि तिसरे होते घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हायप्रोफाइल मर्डरकेसची आरोपी नेहा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...