आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काली मातेच्या मूर्तीसमोर मुलाने दिला आईचा बळी; म्हणे- देवीनेच स्वप्नात येऊन सांगितले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुलिया- काली मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी एका युवकाने आपल्या आईचा बळी दिला. ही घटना पुरुलिया जिल्ह्यातील बाराबाझार पोलिस ठाणे क्षेत्रातील बामग्राम येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. 
 
पोलिस अधीक्षक जॉय बिस्वास यांनी सांगितले की, आरोपी नारायण महतो (३५) याने आई फुली महतो (५५) हिचे डोके खड्गाने उडवले. घटना घडली तेव्हा फुली महतो काली मातेच्या मंदिराचा परिसर झाडत होती. तिला तीन मुले. नारायण हा तिचा सर्वात धाकटा मुलगा. आईचे डोके उडवल्यानंतर तशाच अवस्थेत त्याने मोठ्या भावाच्या घरी धाव घेतली आणि आईने मूर्तीसमोर स्वत:चे डोके उडवून घेतले, असा दावा त्याने केला. 

त्यानंतर त्याचा मोठा भाऊ नारायणसह घरी आला. त्यावेळी आईचे डोके रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याला दिसले. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री नारायणला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर नारायणला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे. 

... म्हणे देवीनेच स्वप्नात येऊन सांगितले  
काली मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आईचा बळी दिल्याची कबुली नारायणने दिली. कुटुंबाच्या प्रगतीसाठी आईचा बळी दे, असे काली मातेने आपल्याला स्वप्नात येऊन सांगितले होते,असे नारायणने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. दरम्यान, शेजाऱ्यांनी सांगितले की, नारायण हा ‘तांत्रिक’होता. तो तांत्रिक विधी करत असे. त्यासाठी त्याने आपल्या घरीच काली मातेचे मंदिर बांधले होते.
बातम्या आणखी आहेत...