आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघात: ड्रायव्हरला अटक, जखमींना सोडून पळून जाण्याचा हेमांवर आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - भाजप खासदार हेमा मालिनी अपघातात जखमी झाल्या आहेत. जयपूरजवळ दौसा येथे झालेल्या या अपघातात एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत. हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आहेत, पण त्या फार गंभीर नसून त्यांना चार टाके पडल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी हेमा मालिनी यांच्या कार चालकाला ओव्हस्पीड ड्रायव्हींगच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
हेमा मालिनी त्यांच्या मर्सिडीझ कारमध्ये मेहंदीपूर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरेला जात होत्या. त्यावेळी जयपूर-आग्रा हायवेवर दौसा येथे समोरून येणाऱ्या अल्टो कारबरोबर त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेमा मालिनी यांच्या डोक्याबरोबरच त्यांच्या पायाला आणि हातालाही जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी जयपूरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेमा मालिनीवर जखमींना सोडून घटनास्थळाहून पळून जाण्याचा आरोप
अपघातानंतर हेमा मालिनी कार ड्रायव्हरला सोबत घेऊन दुसऱ्या कारने जयपूरला गेल्या. त्यांनी अल्टो कारमधील जखमींची विचारपूस केली नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचेही कष्ट घेतले नसल्याचा आरोप होत आहे. हेमा मालिनी या जयपूरच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि कमरेला मार लागला आहे. अपघातात निधन झालेल्या चिमुरडीला वेळेवर उपचार मिळाले असते तर, तिचे प्राण वाचले असते, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, अल्टो कारमध्ये असलेल्या दीडवर्षीय चिन्नी खंडेलवाल हिचा मृत्यू झाला आहे. या अपघातात या मुलीचे वडील हनुमान (30), आई शिखा (28), भाऊ शोमिल (4) आणि सीमा (45) हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्टो कारमध्ये जाणारे हेे कुटुंब जयपूरहून लालसोटकडे जात होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले आहे.
अपघात ओव्हरस्पीडमुळे झाला असण्याची शक्यता - पोलिस अधीक्षक
दौसाचे पोलिस अधीक्षक अंशुमान भौमिया यांनी सांगितले, की ओव्हरस्पीडमुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. कारण अल्टो कार चालकाच्या म्हणण्यानूसार वळणावर त्याला कोणतेही वाहन येत असल्याचे दिसले नव्हते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताचे आणखी काही PHOTO