आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Yogi Adityanath Against Second FIR Registered, Hate Speech

भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ अडचणीत, 24 तासांत दुसरा गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- भाजपचे गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आदित्यनाथ यांच्या विरोधात 24 तासांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीच्या काळात प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. गौतम बुद्ध नगर पोलिस ठाण्यात आदित्यनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी सांगितले की, इलेक्शन कमीशन ऑफर इंडियाने निर्देश दिल्याने खासदार आदित्यनाथ यांच्यावर कलम 125, 153अ, 295अ आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांना नोएडा येथे केलेल्या चिथावणीखोर भाषणावरून चांगलेच फटकारलेही आहे. आदित्यनाथ हे आपल्या भाषणातून द्वेषपूर्ण वक्तव्य करून समाजातील लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच भविष्यात सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना भाजपच्या नेत्यांनी तारतम्य बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, आदित्यनाथ यांच्या विरोधात बुधवारी (10 सप्टेबर) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाषणावर बंदी घातल्यानंतरही प्रचारसभेत खासदार आदित्यनाथ यांनी मोबाईलवद्वारा भाषण केले होते. लखनौ जिल्हा प्रशासनाने प्रचारसभांवर बंदी घातल्यानंतरही योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतली होती. याची गंभीर दखल घेवून न‍िवडणूक आयोगाने प्रचार सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आरोगाने मागितले आहे.