आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-पाकिस्तान सिरीजचे महत्व खेळपेक्षा अधिक, सरकारच घेणार यावर निर्णय; काश्मिरात धोनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सिरीजचे महत्व खेळपेक्षा अधिक आहे असे भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीने म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये सिरीज होणार किंवा नाही, याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे असेही तो पुढे म्हणाला. तो काश्मिरच्या बारामुल्ला येथे क्रिकेट पाहण्यासाठी आला होता. यावेळी त्याने स्थानिकांसह तेथील खेळाडूंशीही संवाद साधला. गेल्या आठवड्यातही त्याने अचानक काश्मिरात येऊन येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली होती. 

 

> बारामुल्ला येथे सामना पाहण्यासाठी धोनी लष्करी युनिफॉर्ममधअये दिसून आला. त्याने यावेळी स्थानिक नागरिक, प्रशासन आणि सर्वच खेळाडूंशी संवाद साधला. तसेच क्रिकेटच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, काश्मिरचा परवेज रसूल याने टीम इंडियामध्ये खेळले आहे.  
> धोनीने याच निमित्त काश्मीरच्या माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये धोनीला बंद झालेल्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सिरीजवर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्येच धोनीने ही सिरीज केवळ खेळच नव्हे, तर इतर बाबतीतही महत्वाची असल्याचे म्हटले. मात्र, अशा प्रकारची सिरीज होणे किंवा न होणे याचा निर्णय सरकार घेणार असेही धोनीने स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...