आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या स्विमिंग पूलला धो-धो पाणी, रांचीची जनता हंडे घेऊन मंत्र्यांच्या दरबारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांचा आरोप आहे, की धोनीच्या घरात दहापेक्षा जास्त लोक नाही तरीही तिथे 15 हजार लिटर पाणी येते. (फाइल फोटो) - Divya Marathi
लोकांचा आरोप आहे, की धोनीच्या घरात दहापेक्षा जास्त लोक नाही तरीही तिथे 15 हजार लिटर पाणी येते. (फाइल फोटो)
रांची- महेंद्रसिंह धोनीच्या पिढीजात घरातील स्विमिंग पूल वादात सापडला आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या देशभरातील 33 कोटी जनतेसोबतच रांचीमधील लोकही पाणी टंचाईचा सामना करत आहेत. त्यांनी झारखंडचे महसूल मंत्री अमरकुमार बाऊरी यांच्या जनता दरबारात याची तक्रार केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, की धोनीच्या स्विमिंगपूलमध्ये दररोज 15 हजार लिटर पाण्याचा वापर होतो.

धोनी कसा आला निशाण्यावर
- रांचीच्या जनतेचा आरोप आहे, की त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि धोनीच्या स्विमिंग पूलमध्ये 24 तास पाणी असते. वास्तविक तो येथे फार राहात देखील नाही. त्याच्या घरातही दहा पेक्षा जास्त लोक नाहीत.
- रांचीतील हरमू भागात धोनीचे घर आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे, की त्यांची स्थिती महाराष्ट्रातील लातूरसारखीच आहे. धोनीच्या घरातील स्विमिंगपूलसाठी 15 हजार लिटरची व्यवस्था होऊ शकते मात्र 5 हजार लोकसंख्या असलेल्या यमुनानगरची कोणालाच काळजी नाही.
- धोनीच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील यमूनानगरमध्ये कुपनलिकेतून (हँडपंप) पाणी येत आहे ना, त्यांच्यासाठी टँकरची व्यवस्था केली गेली आहे.
- येथील जनतेने दोन वर्षांपासून नगरसेवकापासून पालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज-विनंत्या केल्या मात्र काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांनी महसूस मंत्र्यांच्या जनता दरबारात परिसरात पाईपलाईन टाकण्याची मागणी केली आहे.

धोनीच्या निकटवर्तीयांनी आरोप फेटाळले
- रांचीमधील धोनीच्या निकटवर्तीयांनी जनतेचे आरोप सपशेल फेटाळले आहेत. ते म्हणाले, यात सत्यता नाही.
- त्यांचे म्हणणे आहे, स्विमिंग पूलमध्ये कायम पाणी भरलेले नसते. जेव्हा धोनी येथे असतो तेव्हा स्विमिंग पूलमध्ये पाणी राहाते. त्यासाठी कोणाचे हक्काचे पाणी घेतले जात नाही.

दुष्काळावर धोनीने काय दिला होता सल्ला
- सध्या आयपीएल खेळत असलेल्या धोनीने महाराष्ट्रातील दुष्काळामुळे आयपीएल सामना इतरत्र हलवण्याच्या प्रश्नावर म्हटले होते, की यावर दीर्घकालीन उपाय योजली पाहिजे.
- तो म्हणाला होता, 'हे सर्व प्रश्नांवर आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना शोधल्या पाहिजे.'
- 'ज्या भागात पाण्याचा दुष्काळ आहे तिथे पाणीपूरवठा कसा केला जाईल याचा आपण विचार केला पाहिजे.'
- आयपीएल संदर्भातील एका खटल्यात मुंबई हायकोर्टाने 1 मे नंतरचे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचा आदेश दिला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, धोनीचा बंगला
>> सचिनने काय केले दुष्काळग्रस्तांसाठी