आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MSG And LED In Nestle Maggi Is Made From E 635 Meat And Fish News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस्स दोन मिनिटांत तयार होणार्‍या \'मॅगी\'त आढळले मांस आणि \'शिसे\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- 'नेस्ले'द्वारा निर्मित 'मॅगी' हा देशातील पाचवा विश्वासपात्र ब्रांड समजला जातो. परंतु, उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये याच 'मॅगी'ने लाखों भारतीयांचा विश्वासघात केला आहे. 'मॅगी'मध्ये मांस आणि शिसेसारखे हानिकारक पदार्थ आढळून आले आहे. त्यामुळे 'बस्स दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी शरीरासाठी हानिकारक असल्याने त्यावर भारतात बंदी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मॅगीच्या उत्पादनाचा परवानाच रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.

लखनौमध्ये मॅगीचे 12 वेगवेगळे नमुने केंद्र सरकारने कोलकात्यातील प्रयोगशाळेत तपासले. प्रयोगशाळेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. मॅगीत मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. ते मानवी शरीरासाठी हानिकारक असल्याचे लखनौच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (एफएसडीए) म्हटले आहे. तसेच एफएसडीएने या प्रकरणाच्या चौकशी सुरु केली आहे. भारताच्या अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरणाला (एफएसएसएआय) पत्र लिहून याप्रकऱणी मॅगीचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोलकाताच्या प्रयोगशाळेत आम्ही मॅगीचे काही नमुने तपासले. या तपासात मॅगीमध्ये शिस्याचे प्रमाण 17.2 पार्ट्स प्रति मिलियन (पीपीएम) आढळून आले. मर्यादेपेक्षा शिस्याचे प्रमाण सात पटीने जास्त आहे. मॅगी नूडल्‍समध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्‍लूटामॅट (एमएसजी) अधिक प्रमाणात आढळून आल्याचे एफडीएचे साहाय्यक निरीक्षक जनरल डी.जी. श्रीवास्‍तव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 'नेस्ले' कंपनीने एफडीएचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मॅगीमध्ये अशा प्रकारचे हानिकारक पदार्थ नसल्याचे 'नेस्ले'ने म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय आहे मोनोसोडियम ग्लुटामेट....