आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलामावर प्रेम करु लागली होती रजिया सुल्तान, या किल्ल्यात झाली होती कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 सप्टेंबर रोजी संपूर्ण जग वर्ल्ड टुरिस्ट डे साजरा करणार आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com घेऊन आले आहे एका अशा किल्ल्याची माहिती, जे देशाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबच्या भठिंडा येथील मुबारक या किल्ल्याचे दुसरे वैशिष्टय हे आहे की येथे पहिली महिला शासक रजिया सुल्तानला सण 1239 मध्ये कैद करुन ठेवण्यात आले होते. रजिया सुल्तानचा प्रियकर याकूतला ठार करुन तिचा गव्हर्नर अल्तुनियाने तिला येथे कैद केले होते. याकूत रजिया सुल्तानचा गुलाम होता.
रजियाचा घोडेस्वार होता याकूत
रजिया सुल्तान ही देशातील पहिली महिला शासक होती. ती पुरुषांप्रमाणे कपडे घालत होती आणि दरबारात बसत होती. एका चांगल्या शासकामध्ये पाहिजे ते सर्व गुण तिच्यामध्ये होते. तिच्या कार्यकाळात एक वेळ अशी आली होती, की ती दिल्लीच्या तख्तावरील सर्वात शक्तीशाली मल्लिका होणार, असे वाटत असतानाच गुलाम याकूत सोबतच्या संबंधामुळे तसे होऊ शकले नाही, असे काही इतिहासकारांचे मत आहे. याकूत रजियाला घोडेस्वारी करवत होता. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि तिने त्याला स्वतःचा खासगी कारभारी नेमले. काही इतिहासकारांच्या मते याकूत तिचा विश्वासपात्र सेवक होता, तो तिचा प्रियकर नव्हता असेही मत आहे.

गुलामासोबतच्या प्रेमामुळे बालपणीचा मित्र बनला शत्रू
गुलाम याकूतसोबतच्या प्रेम संबंधामुळे सगळे तुर्क रजियाच्या विरोधात गेले. याकूत तुर्क नव्हता. यामुळे तिचा बालपणीचा मित्र आणि भठिंडाचा गव्हर्नर मलिक अल्तुनिया देखिल तिच्या विरोधात गेला. तुर्क सैन्याला आपल्या बाजूला करुन घेण्यात अल्तुनिया यशस्वी झाला. मल्लिका रजिया सुल्तानला सत्तेतून बेदखल करण्यासाठी त्याने षडयंत्र रचले. त्याने रजियाची सत्ता स्विकारण्यास नकार दिला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात याकूत मारला गेला आणि रजियाला अल्तुनियाने भठिंडाच्या मुबारक किल्ल्यात कैद केले.

बहरामला बसवले गादीवर
रजिया सुल्तानला कैद केल्यानंतर अल्तुतमिशचा तिसरा मुलगा आणि रजियाचा भाऊ बहराम शाहला गादीवर बसवण्यात आले. रजिया किल्ल्यात कैद होती. मृत्यूपासून सुटका होण्यासाठी तिने अल्तुनियासोबत लग्न करण्यास होकार दिला. यामुळे रजीयाचा जीव वाचला पण बहराम शाह दिल्लीची गादी सोडण्यास तयार नव्हता. अल्तुनियाने पत्नी रजियाला पुन्हा गादीवर बसवण्याची खटपट सुरु केली, पण बहरामच्या विरोधापुढे त्याचा टिकाव लागला नाही. अखेर बहारामकडून पराभव झाल्यानंतर रजियासोबत वेशांतर करुन अल्तुनिया पळून गेला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो