आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mufti Mohammed Sayeed Daughter Rubaiya Live Low Profile Life

चेन्नईमध्ये लो प्रोफाइल आयुष्य जगत आहे रुबिया, 1989 मध्ये झाले होते अपहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. रुबिया सईद (फाइल फोटो) - Divya Marathi
डॉ. रुबिया सईद (फाइल फोटो)
चेन्नई - जम्मु-काश्मीरचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या डॉ. रुबिया सईद या अतिशय साधे आयुष्य जगत आहेत. त्या चेन्नईमध्ये चेटपेट येथे कुटुंबासोबत राहातात. रुबिया यांचे 1989 मध्ये श्रीनगच्या जेकेएलएफच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांना पाच दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. विशेष म्हणेज रुबिया यांचे वडील सईद तेव्हा केंद्रीय गृहमंत्री होते.

कसे आहे आता रुबिया यांचे आयुष्य
- डॉ. रुबिया चेन्नईमधील हर्रिग्टन रोडवरील तारापूर एव्हेन्यूमध्ये कुटुंबियांसोबत राहातात.
- स्थानिक वृत्तपत्रांनुसार त्या दहा वर्षांपासून येथे पती आणि दोन मुलांसह राहात आहेत.
- त्यांच्या कुटुंबाला तामिळनाडू सरकारकडून स्पेशल आर्म्ड फोर्स यूनिटची सुरक्षा देण्यात आली आहे.
- पाच जवान 24 तास त्यांच्या सुरक्षेत तैनात असतात.
- शेजाऱ्यांशी रुबिया यांचे चांगले संबंध आहेत. त्या रोज त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करतात. स्वतःबद्दल त्या फार बोलत नाही, मात्र त्यांचे वागणे मैत्रिपूर्ण असते.
- रुबिया यांचे पती शरीफ अहमद एका ऑटोमोबाइल शोरुमचे मालक आहेत.
- त्यांच्याबद्दल कोणीच काही सांगत नाही. रुबिया यादेखिल फार कमी लोकांना भेटतात.
- सुरक्षा एवढी कडक आहे, की दुधवाला आणि सफाई कामगारांनाही एका निश्चित एरियाच्या पुढे जाण्याची परवानगी नाही.
- दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद कधी रुबियायांच्या घरी आल्याचे कोणाला स्मरत नाही.

सईद यांच्या अखेरच्या दिवसात सोबत होती रुबिया
- मुफ्ती मोहम्मद सईद यांना 24 डिसेंबर 2015 रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान रुबिया त्यांच्यासोबत होत्या. गुरुवारी सईद (वय 80 वर्षे) यांचे निधन झाले.

कसे झाले होते अपहरण
- रुबिया यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते तेव्हा त्यांचे वय 23 वर्षे होते. तेव्हा त्या वुमन हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होत्या.
- 8 डिसेंबर 1989 मध्ये ड्यूटी संपवून त्या घरी परतत असताना त्यांचे अपहरण झाले. तेव्हा त्यांना कोणतीही सुरक्षा नव्हती.
- डॉ. रुबिया एका मिनीबसमध्ये बसलेल्या होत्या. जेकेएलएफचे दहशतवादी त्याच बसमध्ये चढले.
- थोड्या वेळानंतर बसला हायजॅक करण्यात आले.
- दहशतवाद्यांनी बंदूकीचा धाक दाखवून रुबिया यांना बसमधून खाली उतरवले आणि मारुती कारने अज्ञातस्थळी घेऊन गेले.
दहशतवाद्यांनी पत्रकाराला फोन करुन दिली होती अपहरणाची बातमी
- दोन तासानंतर जेकेएलएफने एका पत्रकाराला फोन करुन रुबिया यांच्या अपहरणाची माहिती दिली.
- रुबिया यांच्या सुटकेसाठी जेकेएलएफने सात दहशतवाद्यांच्या मुक्ततेची अट ठेवली होती.
- तेव्हा केद्रात विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार होते. तर मुफ्ती मोहम्मद सईद केंद्रीय गृहमंत्री होते.
- रुबिया 122 तास दहशतवाद्यांच्या तावडीत होत्या, मात्र सुटका झाल्यानंतर त्यांनी कधीही त्या बद्दल अवाक्षर काढले नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुटकेनंतरचे क्षण