आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mughal Road Closed After Snowfall At Jammu Kashmir

PHOTOS: जम्मू- काश्मीरमध्ये तुफान हिमवृष्टी; शेकडो वाहने अडकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीर खोऱ्यात तुफान हिमवृष्टी सुरूच आहे. हिमवृष्टीमुळे पारा पुन्हा एकदा उणे 3.8 अंशांपेक्षा खाली घसरला आहे. त्यामुळे मुघल रोडवर ट्रॅफिक जॅममध्ये शेकडो वाहने अडकली आहेत. श्रीनगरमध्ये किमान तापमान 5.5 अंश सेल्सियसवरून उणे 3.8 अंशांपर्यंत घसरले आहे.

गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे 9 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. प्रशासनाने बर्फ हटवण्याचे काम सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यापूर्वीही ठप्प झाला होता मुगल रोड...
- हिमवृष्टीमुळे गेल्या नोव्हेंबरमध्ये मुगल रोड पाच दिवस ठप्प होता.
- पुंछ जिल्ह्यातील शोपियाला जोडणारा मार्ग रामसू व मगरकोट भागात झालेले भूस्खलन व हिमकडे कोसळल्यामुळे ठप्प झाला होता.

कारगिल सर्वाधिक Cool
- अमरनाथ गुफा मंदिरासह पहलगाम भागात हलकी हिमवृष्‍टी होत आहे.
- राज्यात कारगिलमध्ये सर्वात जास्त थंडी आहे.

पुढील स्लाइडवर पाहा काश्मीर खोऱ्यातील हिमवृष्टीचे फोटोज...