न्यूयॉर्क - प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीचा मुलगा मोहम्मद अली ज्यूनियर (44) याला फ्लोरिडाच्या विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसर्सने काही तासांसाठी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करण्यात आली. अलीच्या फॅमिलीने सांगितल्यानुसार, त्याला पुन्हा पुन्हा नाव विचारण्यात येते होते. तुला हे नाव कसे मिळाले? तू मुस्लिम आहेस का? अशा प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती केली जात होती. अमेरिकेत ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या नव्या आदेशानंतर अमेरिकेच्या विमानतळावर कडक चौकशी केली जात आहे.
- न्यूज एजन्सी रिपोर्टनुसार, हे प्रकरण 7 फेब्रुवारीचे आहे.
- मोहम्मद अली ज्यूनियर आणि त्याची आई खलीला कामचो-अली जमैका येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन पोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते.
- त्यांच्या नावामुळे इमिग्रेशन ऑफिसरने त्यांची वारंवार चौकशी केली.
आईला सोडले, मुलाला थांबवले
- काही वेळानंतर खलीला कामाचो-अली यांना सोडून देण्यात आले. रिपोर्टनुसार, खलीला यांनी मोहम्मदल अलीसोबतचा आपला फोटा दाखविला होता. त्यानंतरही मुलाला दोन तास बसवून ठेवले गेले, कारण अलीसोबत त्याचा फोटो नव्हता.
- ऑफिसर त्याला वारंवार एकच प्रश्न विचारत होते, तुला हे नाव कसे मिळाले ? तू मुस्लिम आहेस का ?
- जेव्हा त्याने होय मी मुस्लिम आहे असे सांगितले तेव्हा तुझा जन्म कुठे झाला, धर्म केव्हा मिळाला असे प्रश्न विचारले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)