फोटो : राजेंद्र प्रसाद घाटावर नीता अंबानी यांच्या वाढदिवसासाठी सुरू असलेली सजावट.
वाराणसी - देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी यांचा 51 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज वाराणसीला पोहोचणार आहेत. येथे राजेंद्र प्रसाद घाटावर होणा-या आरतीमध्ये अंबानी कुटुंबीय सहभागी होतील. त्यांच्या स्वागतासाठी घाटावर 11000 स्क्वेअर फुटात रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे. घाटालक फुलांनी आणि रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. अंबानी कुटुंबीय येथे दोन दिवस राहणार आहेत.
असा असेल सोहळा
मुकेश अंबानी कुटुंबीयांसह चार्टर प्लेनने दुपारी वाराणसीत येतील. त्यांच्यासोबत 50 हून अधिक व्हीव्हीआयपी येणार असल्याची माहितीही मिळाली आहे. सोहळ्यासाठी चार चार्टर प्लेन बूक करण्याच आल्याची माहिती मिळाली आहे. एका प्लेनमद्ये मुकेश अंबानी कुटुंबीयांबरोबर असतील. तर इतर तीन विमानांमध्ये व्हीव्हीआयपी असतील. सर्व विमाने लाल बहादूर शास्त्री विमानतळावर उतरतील. येथून अंबानी कुटुंबीय आणि अतर सर्व पाहुणे हॉटेल गेटवे येथे जातील. त्याठिकाणी नीता आंबानींचा वाढदिवस साजरा केला जाईल. त्यासाठी दहा खोल्या आणि 30 सुइटसाठी 25 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तर कोठीच्या सजावटीसाठी 15 लाख खर्च करण्यात आले आहेत. सायंकाळी सुमारे पाच वाजता अंबानी दाम्पत्य विश्वनाथ मंदिरात जाईल. येथे पूजेनंतर राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा आरतीमध्ये ते सहभागी होतील. मंदिर आणि घाटावर फुलांच्या सजावटीसाठी 10 लाख रुपये खर्च केले जात आहेत. त्यासाठी घाटावर प्रथमच लाकडाच्या वेगळ्या पाय-या तयार करण्यात आल्या आहेत.
मेनूमध्ये बनारसी पान आणि ठंडाई
सायंकाळनंतर ताज पॅलेसमध्ये बर्थ डे पार्टीला सुरुवात होईल. त्यात मुंबईतून येणारे अनेक कलाकार सादरीकरण करतील. बॉलीवूडचे अनेक स्टार पार्टीत सहभागीही होतील. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीबरोबर पार्टीत सहभागी होईल. पाहुण्यांसाठी भोजनाच्या मेन्यूमध्ये अनेक लज्जतदार पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिलेबी-कचोरी, मलई-रबडी, पाणीपुरी आणि बनारसी ठंडाई, पान याचाही मेन्यूमध्ये समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खानपानावर सुमारे 20 लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, वाढदिवसासाठी वाराणसीतील घाटावर सुरू असलेली सजावट