आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी सरकारचे फक्त विकासावर लक्ष, टीकेला जोरदार प्रत्युत्तर द्या : नक्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - केंद्र सरकार पहिल्यांदाच राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त विकासावरच लक्ष केंद्रित करून आहे, असे गौरवोद््गार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काढले आहेत.

मध्य प्रदेशमधील प्रवक्त्यांसाठी माध्यम व्यवस्थापन विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी नक्वी म्हणाले की, केंद्रातील भाजपप्रणीत केंद्र सरकारचे संपूर्ण लक्ष विकासावरच केंद्रित आहे. त्यामुळे सरकारवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचे काम भाजपच्या सर्व प्रवक्त्यांचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने मागच्या वर्षभरात जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांचा लोकांना कसा फायदा मिळवून देता येईल, याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्य करायला हवे, असे आवाहन त्यांनी सर्व प्रवक्त्यांना या वेळी केले. वर्षपूर्तीच्या निमित्ताने सरकारला विरोधकांनी अनेक आघाड्यावर घेरण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या
केंद्रातील सरकार उत्कृष्ट कार्य करत आहे. मात्र, विरोधक विनाकारण सरकारची बदनामी करत आहेत. या निरर्थक बदनामीला तोंड देण्यासाठी सज्ज राहा, असा सल्ला नक्वींनी प्रवक्त्यांना दिला. विरोधकांच्या टीकेला तोंड देण्यासाठी आपल्या योजना पुरेशा आहेत. त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहा, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...