आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukul Roy Threatens To File Defamation Against CPI M Leaders

बन्सलनंतर मुकुल रॉय यांच्याभोवती चौकशीचा फास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - पवनकुमार बन्सल यांच्यापाठोपाठ माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय हेसुद्धा सीबीआय चौकशीच्या फेर्‍यात अडकू शकतात. त्यांच्या काळात झालेल्या 12 अधिकार्‍यांच्या नियुक्त्या सध्या रडारवर असून या प्रकरणी दोन दिवसांत नवा गुन्हा दाखल होऊ शकतो.

रेल्वे बोर्डाचा निलंबित सदस्य महेश कुमार याच्या फोन रेकॉर्डवरून रॉय यांच्या काळातही नियुक्त्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती आले आहेत. बन्सल यांच्या काळात 30 एप्रिल रोजी 13 नियुक्त्या झाल्या होत्या. त्याचीही चौकशी होईल. अधिकार्‍यांचे फोन डिटेल्स मागवले असून, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. विजय सिंगला व संदीप गोयल यांच्या संपर्कात असलेल्या कपूरथळा येथील कोचनिर्मिती फॅक्टरीतील अधिकार्‍यालाही ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.