आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द ग्रेट इंडियन पॉलिटिकल फॅमिली ड्रामा: मुलायमकडून पक्षफुटीची घोषणा, नवी यादी जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यात वर्चस्वांची लढाई सुरूच आहे. समेटासाठी शनिवारी अनेक बैठकांच्या फेऱ्या होऊनही त्यात यश मिळाले नाही. यादरम्यान प्रा. रामगोपाल यादव यांनी पक्षाचे आमदार, संसदीय पक्षाच्या नेत्यांची शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे दाखल केली. या नेत्यांनी अखिलेशला पक्षाचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. मुलायम आणि अखिलेशच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत चाललेल्या बैठका शनिवारी सकाळी १० पर्यंत सुरू होत्या.
 
सकाळी १० वाजता : शिवपाल नेताजींकडे, नंतर अखिलेशकडे
शिवपाल शनिवारी सकाळी आधी नेताजीकडे गेले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री अंबिका चौधरी, नारद यादव आणि ओमप्रकाशसिंग होते. विधानसभा अध्यक्ष माताप्रसाद पांडे हेही होते. दुसरीकडे, अखिलेशच्या शासकीय निवासस्थानी कॅबिनेटची बैठक सुरू होती.
 
मुलायमांकडून नवी यादी 
यादरम्यान वृत्त आले की, मुलायमसिंग नव्याने उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. आझम खान मुलायमसिंगांकडे गेले होते. शुक्रवारी रात्री १२ पर्यंत ते त्यांच्यासमवेत होते. 

अखिलेशच्या अटी
- राष्ट्रीय अध्यक्षपद हवे.
- अमरसिंग यांची हकालपट्टी
- शिवपाल यादवही नकोत
- तिकीट वाटपात स्वातंत्र्य मिळावे. काँग्रेसशी आघाडी करावी. 

मुलायमसिंगांच्या अटी
- पक्षाध्यक्षपद सोडणार नाही.  
- शिवपालला पक्षाचा महासचिव करावे. त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात यावी. 
- तिकीट वाटपात शिवपाल आणि मुलायम समर्थकांना न्याय वाटा मिळावा. 
- रामगोपालला पक्षातून काढावे.

आघाडीचे गणित: अखिलेश-काँग्रेस यांची आघाडी झाली तर प्रमोद तिवारींकडे उपमुख्यमंत्रिपद
अखिलेशचा गट काँग्रेसशी आघाडी करणार हे जवळपास नक्की. काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत पक्षाच्या २० विद्यमान आमदारांची उमेदवारी पक्की करणे, हा या रणनितीचा एक भाग आहे. काँग्रेसने १०० हून अधिक उमेदवारांच्या नावांची यादी अखिलेशकडे दिली असल्याची चर्चा आहे. आघाडी झाली तर खा. प्रमोद तिवारीकडे उपमुख्यमंत्रिपद जाईल. 

सपाशी वाटाघाटी करण्यात तिवारी निष्णात
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने विद्यमान २० आमदारांसह ८५ जागा मागितल्या आहेत. 
- प्रमोद तिवारींसाठी उपमुख्यमंत्रिपद मागण्यात आले असून सपाशी ते चांगले जुळवून घेतात. यामुळेच त्यांचे नाव पुढे करण्यात आले.
- काँग्रेस पक्षाचा रोख ब्राह्मण वर्गाकडे जास्त आहे. 
- रीता बहुगुणा जोशी आणि प्रमोद तिवारी दोघांपैकी एकाला नेतृत्व करू देण्यात मतभेद होते. आता रीता भाजपमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे प्रमोद तिवारी यांचेच नेतृत्व राहील. ते सपाच्या मदतीनेच राज्यसभेत निवडून गेले आहेत. 
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांतशी आघाडीसंदर्भात सहमती न झाल्याने प्रमोद तिवारी यांनीच काँग्रेसकडून आघाडीची बाजू सांभाळली आहे. 
बातम्या आणखी आहेत...