आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, लालुंच्या उपस्थितीत मुलायम यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटणा येथे लावण्यात आलेले नितीश कुमार यांचे पोस्टर. - Divya Marathi
पटणा येथे लावण्यात आलेले नितीश कुमार यांचे पोस्टर.
पटना/नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नितिश कुमार हे सपा, राजद आणि जेडीयू यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी दिल्लीत राजदचे प्रमुख लालप्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. धार्मिक शक्तींना रोखण्यासाठी जेडीयूबरोबर आल्याचे लालूप्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यापूर्वी रविवारी लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सोमवारी काँग्रेस आणि जेडीयू यांच्यातही आघाडी झाल्याची बातमी येत आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी आधीच नितीशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, मंगळवारी नितीश कुमार मोठ्या प्रमाणावर प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे समजते आहे. नितीश कुमार यांनी प्रचारासाठी ज्या टीमवर जबाबदारी दिली आहे, ती टीम मंगळवारी पहिले मोठे कँपेन 'जन भागीदारी अभियान' नावाने सुरू करणार आहे. याच टीमने मोदींसाठी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती.

मोठ्या प्रमाणावर तयारी
‘जन भागीदारी अभियान’ संदर्भात अद्याप माहिती आलेली नाही. मात्र या अंतर्गत ‘बढ चला बिहार’ अभियानाद्वारे चाळीस हजार गावांतील चार कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आहे. त्यासाठी सुमारे 400 ट्रक तयार केले जात आहेत. ते टिव्ही, म्युझिक सिस्टीम, मायक्रोफोन आणि स्पिकर्सने सज्ज असतील. ट्रकवर कँपेन टीमचा एक एक व्यक्ती गावोगाव जाऊन सरकारच्या कर्तृत्वाचा पाढा वाचणार आहे.

ब्रेकफास्ट विथ CM
काही उपक्रमांची रुपरेषाही ठरवण्यात आली आहे. त्यात ‘ब्रेकफास्ट विथ सीएम’ आणि ‘बिहार विकास संवाद’ यांचा समावेश असेल. बिहार विकास संवादचे आयोजन मेट्रो सिटीजमध्ये केले जाईल. त्यात गेल्या 10 वर्षात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला जाईल. ‘जिज्ञासा’ नावाच्या आणखी एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीत मोदींनी राबवलेल्या ‘मंथन’ कँपेनच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाईल. ‘गौरव गोष्ठी’ द्वारे सरकार 38 जिल्ह्यांत जनतेसमोर आपल्या कामाचा हिशेब सादर करतील.

बूथ मॅपिंगचे काम सुरू
कँपेन टीमने एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. ही टीम बूथ मॅपिंग करणार आहे. त्यासंदर्भातील काम सुरू करण्यात आले आहे. त्यात सहा लाख बूथची माहिती गोळा केली जाईल. याच स्ट्रॅटेजीअंतर्गत जेडीयूच्या नेच्यांच्या भाषणांचे इनपुट्स प्रचारासाठी वापरले जातील.
बातम्या आणखी आहेत...