आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाने आम्हाला बरबाद केले; मोदींनी खोटे बोलून जनतेची केली फसवणूक: मुलायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैनपुरी- समाजवादी पार्टीचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने आम्हाला बरबाद करण्यात कसलीही कसर सोडली नाही. काँग्रेसने माझ्यावर अनेक खटले भरले, परंतु अखिलेशने त्यांच्याशी आघाडी केली. जो वडिलांचा होऊ शकत नाही तो इतरांचा काय होणार आहे, असे मुलायम यांनी म्हटले आहे.  

मुलायम यांच्या हस्ते रविवारी गुनईया गावातील एका पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते पुढे म्हणाले, मोदींविषयी बोलायचे झाल्यास त्यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट खोटे बोलून जनतेची फसवणूक मात्र केली. तत्पूर्वी मुलायम यांचे बंधू शिवपाल यादव म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत सेक्युलर मोर्चाची स्थापना केली जाणार आहे. मी मागे हटणार नाही. सेक्युलर माेर्चाचा उद्देश सामाजिक न्याय मिळवून देणे असा आहे. हा मोर्चा गरीब, वंचितांसाठी संघर्ष करेल.दरम्यान, निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीतील दुफळी स्पष्टपणे दिसून आली होती. परस्परांतील वादंगामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

काका-पुतण्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. परंतु त्यानंतर अखिलेश यांनी समर्थकांच्या माध्यमातून दबाव वाढवून पक्षाचे अध्यक्षपद स्वत:कडे  घेतले. तेव्हा शिवपाल अधिक नाराज  झाले होते. आता पुन्हा त्यांनी जाहीरपणे आव्हान दिले आहे.  

‘आठवड्यापासून भेट नाही’  
शिवपाल यांनी नवीन पक्षाची स्थापना करण्यासंबंधी भूमिका जाहीर केली तेव्हा त्यांनी नेताजींकडे प्रमुख पद असेल, असे स्पष्ट केले होते. परंतु शिवपाल यांना मी आठवड्यापासून भेटलोच नाही, असे मुलायम यांनी सांगितले होते.  
बातम्या आणखी आहेत...