आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Singh Daughter in law Praises Narendra Modis Swachh Bharat Campaign

मुलायम यांच्या सूनेने नरेंद्र मोदींवर उधळली स्तुतिसुमने, महात्मा गांधीशी केली तुलना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अपर्णा यादव)

लखनौ- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. एवढेच नाही तर नरेंद्र मोदी यांची तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी केली आहे. अपर्णा यादव या मुलायम यांचे धाकटे चिरंजीव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा सावत्र भाऊ प्रतीक यादव यांची पत्नी आहे.

अपर्णा यादव यांनी गुरुवारी (13 नोव्हेंबर) एका कार्यक्रमात संबोधित केले. अपर्णा यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियान'ची प्रशंसा केली. मोदी यांच्या व्यक्तिमत्वाची देशातील जनतेच्या मनावर सकारात्मक छाप पडली आहे. त्यामुळेच देशात परिवर्तन घडून आले आहे. मोदींचे कार्य महात्मा गांधी आणि राम मनोहर लोहिया यांच्या कार्यासारखे महान असल्याचे अपर्णा यादव यांनी म्हटले आहे. मोदी हे रोल मॉडेल असून त्यांची झाडू हातात घेतल्यानंतर देशातील जनतेने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अपर्णा यांनी म्हटले.

चांगल्या कामाची आपण दखल घेतली पाहिजे. मोदी यांनी आपल्या स्वच्छ भारत अभियानाच्या देशाला मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मोदींच्या कार्याची प्रशंसा करणे काही गैर नसल्याचे अपर्णा यादव यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत स्वच्छ भारत अभियान लॉन्च केले. अखिलेश यादव यांनीही मोदींच्या स्वच्छ अभियानात सहभागी होण्यास होकार दिला होता.