लखनऊ- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन समाजवादी पक्षात पुन्हा एकदा यादवी माजू शकते. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे दुर्लक्ष करत मुलायम सिंह यादव यांनी NDA च्या उमेदवाराचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवार हा कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा नसावा व तो सगळ्यांना मंजूर असावा अशी अट ठेवली आहे.
राजनाथ आणि व्यंकय्या यांनी केली मुलायम सिंह यांच्यासोबत चर्चा
- राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी मुलायम सिंह यादव यांच्यासोबत याविषयावर शुक्रवारी चर्चा केली.
- भाजपने बनवलेली समिती सर्वानुमते राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करत आहे.
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल त्यांच्या मनात असलेला संशय व्यक्त केला. पक्ष हाताळण्याच्या अखिलेश यांच्या पध्दतीवरही त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे.
- समाजवादी पक्षांची जास्तीत जास्त मते भाजपच्या उमेदवारालाच मिळतील असा विश्वास भाजप नेत्यांना आहे.
अखिलेश देतील काँग्रेस उमेदवाराला साथ : सूत्र
- भाजप नेत्यांनी मुलायम सिंह यादव यांना एपीजे अब्दुल कलाम यांना एनडीएच्या वतीने राष्ट्रपती बनविण्यात आले होते याची आठवण करुन दिली.
- मुलायम सिंह यादव यांनी एनडीएच्या उमेदवाराचे समर्थन केल्यास तो काँग्रससाठी मोठा झटका असेल.
- अखिलेश यादव हे मात्र गैर एनडीए पक्षांचीच साथ देतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.