आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायमसिंह यांनी पक्ष कार्यालयाला ठोकले कुलूप; अखिलेशची नेमप्लेट काढली, म्हणाले मीच अध्यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात पिता-पुत्र यांच्यातील राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. एक जानेवारीच्या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर मुलायमसिंह पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात आले आणि स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केले. कार्यालयाला कुलूप लावले. आपली आणि शिवपालची नेम प्लेट लावली आणि दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत पत्रपरिषदेतही वक्तव्य बदलत राहिले.
 
कार्यालयाबाहेर म्हणाले- 
अखिलेशला अध्यक्षपद देण्याएवढा मी मूर्ख आहे का? 
पत्रकारांनी पिता-पुत्र यांच्यातील समझोत्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षात वाद नाही. त्यावर पत्रकारांनी विचारले की मग अखिलेश पक्षाध्यक्ष राहतील का? मुलायम म्हणाले-
मी एवढा मूर्ख वाटतो का?
 
दिल्लीत बदलले वक्तव्य-
अखिलेश मुलगा आहे, तो जे करत आहे, ते करू द्या...
मुलायमसिंह यादव दिल्लीत पोहोचले आणि थेट अमरसिंहांच्या घरी गेले. तेथे कार्यकर्त्यांसमोर भावुक होऊन म्हणाले- माझ्याकडे आमदार आहेत. अखिलेश बंडखोर आहे, पण माझा मुलगा आहे. तो जे करत आहे, ते करू द्या.

पत्रकार परिषदेत म्हणाले- 
मी पक्षाध्यक्ष आणि मुलगा यूपीचा मुख्यमंत्री आहे
पत्रकार परिषदेत मुलायमसिंह म्हणाले-मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. शिवपाल यादव  यूपीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. रामगोपाल यादव खोटे आहेत. त्यांना पक्षातून ६ वर्षे निलंबित केले होते. त्यामुळे अधिवेशन चुकीचे आहे.
 
अखिलेश सायकलपेक्षा मोठा ब्रँड, नेताजींची दिशाभूल : रामगोपाल 
प्रा. रामगोपाल म्हणाले की, यूपीत अखिलेश सायकलपेक्षा मोठा ब्रँड आहे. अमरसिंहांवर निशाणा साधताना म्हणाले की, बाहेरचे काही लोक नेताजींना स्वतंत्रपणे विचारच करू देत नाहीत. खोटे लोक खोट्या गोष्टी करतात.
 
घराला घरच्याच दिव्यामुळे लागली आग : अमरसिंह
अमरसिंह म्हणाले की, सरकार बनवण्यासाठी संख्याबळ गरजेचे असते. संख्येच्या आधारे पक्षावर कब्जा केला जाऊ शकत नाही. खापर माझ्यावर,  शिवपालवर फोडले जात आहे. या घराला घरच्याच दिव्यामुळे आग लागली.
 
नेम प्लेटवर शिवपाल सिंचनमंत्री...
मुलायम पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाले-लवकरच वाद मिटेल. मग राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या दालनाला कुलूप ठोकले. नेम प्लेट बदलली. या नेम प्लेटवर मुलायम यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवपाल यांना सिंचनमंत्री म्हटले आहे.