आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Singh Says Samajwadi Party Theoretical But Bjp Promises False

मुलायमसिंह म्हणाले- भाजपची आश्वासने खोटी, सपा सिद्धांतावर चालणारा पक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने मला अनेकदा त्रास दिला आहे. परंतु आता माझ्या प्रामाणिकपणास सीबीआयचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्रास झाला, मात्र त्यातून बाहेर पडलो, अशा सूचक शब्दांत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यांनी आपला अनुभव मांडला.

गरीब समुदायातून आलेल्या व्यक्तीला नेहमीच अशा प्रकारच्या (सीबीआय चौकशी) समस्यांना तोंड द्यावे लागते. सगळ्यांना मला एवढेच सांगायचे आहे की त्यांनी आपल्या बँक खात्यासंबंधीची कागदपत्रे तयार ठेवली पाहिजेत. अन्यथा सीबीआय त्यांना घाबरवू शकते. मलाही सीबीआयने त्रास दिला. त्यांनी माझ्या घराची झडती घेतली. माझ्या नातेवाइकांचाही तपास केला. बेकायदा संपत्तीच्या प्रकरणात चौकशी झाली होती. मी प्रामाणिक आहे, असे प्रमाणपत्रच आता सीबीआयकडून मला मिळाले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. २००७ मध्ये मुलायम यांच्या विरोधात चौकशी सुरू केली होती. पुरेशा पुराव्यांअभावी त्यांच्याविरोधातील खटला चालू शकला नव्हता.
२०१३ मध्ये तो मागे घेण्यात आला. त्यांच्या विरोधातील प्रकरण बंद करण्यात आले.
पंतप्रधानांवर टीका
निवडणुकीच्या काळात काळ्या पैशांबाबत मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्यात येतील. रोजगार मिळेल, तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. पाकिस्तानसोबत आता हातमिळवणी केली जात आहे. मोदी ज्यावेळी चिनी राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन करत होते, त्याच वेळी दुसरीकडे सरहद्दीवर चिनी सैनिकांची घुसखोरी सुरू होती, अशी टीका मुलायम यांनी सरकारवर केली.