आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Singh Son Prateik Aparna Valentines Love Story

ही आहे मुलायम यांची सून व मुलगा, 10th पासून सुरू आहे यांची LOVE स्‍टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- अखिलेश यादव आणि डिंपल यांच्‍याशिवाय यादव परिवारात आणखी एक Love Couple आहे. मुलायम यांचा लहान मुलगा प्रतीक आणि अपर्णा यांची लव्‍ह स्‍टोरी हायस्‍कुलपासून सुरू झाली. अपर्णा, प्रतीकच्‍या बॉडीमुळे इंप्रेस होती. ब्रिटनच्‍या एका वृत्‍तपत्राला माहिती देताना अपर्णाने सांगितले होते, 8 वर्षांपासून आमची मैत्री आहे. त्‍यामुळे तुम्‍ही आम्‍हाला हायस्‍कुल स्‍विटहार्ट्स असेही म्‍हणू शकता.
प्रतीकच्‍या बॉडीवर इंप्रेस झाली होती अपर्णा....
10 व्‍या वर्गात अपर्णा आणि प्रतिक यांचे प्रेम जुळले. एका मुलाखतील त्‍यांनी या बाबीचा खुलासा केला होता. 1988 जन्‍मलेले प्रतिक बॉडी बिल्डर आहेत. त्‍यांचे मित्र सांगतात की अपर्णा प्रतीकच्‍या बॉडीवर इंप्रेस झाली होती.
दोघांचे छंद वेगवेगळे....
- प्रतीक यादव रिअल इस्टेट व्यवसाय सांभाळत बॉडी बिल्डिंगचा छंद जोपासतात.
- लखनौमध्‍ये त्‍यांनी नुकताच 'आयरन कोर' नावाचा जिम उघडला आहे.
- तर, अपर्णाला गायनाची आवड आहे.
- गायनासह त्‍या 'बी-अवेयर' नावाची सामाजिक संस्‍थाही चालवतात.
लग्‍नात आले होते अमिताभ-जयासह इतर सेलेब्‍स
- 8 वर्षाच्‍या मैत्रीनंतर सप्‍टेंबर 2010 मध्‍ये प्रतीक-अपर्णाचे लग्‍न ठरले. नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये ही जोडी विवाहबद्ध झाली.
- या लग्‍नात अमिताभ-जया बच्चन, अनिल अंबानी यांच्‍यासह इतरही सेलेब्‍स होते.
- सध्‍या दोघांना प्रथमा नावाची एक मुलगीही आहे.
- अपर्णा मॅनचेस्टर यूनिवर्सिटीतून इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्‍ये P.‍G. आहे. प्रतीक यांनी लीड्स यूनिवर्सिटीतून मॅनेजमेंटची पदवी मिळवली.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अपर्णा आणि प्रतीक यांचे फोटो....