आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनौ- पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्माच्या मुद्दय़ावर भाजपच्या सहकार्याला जागत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यांनी शनिवारी लालकृष्ण अडवाणी यांची तोंडभरून स्तुती केली. तसेच पुत्र अखिलेश यादव आणि त्यांच्या सरकारला चांगलेच फटकारले. मुलायम यांनी राज्याच्या मंत्र्यांना सुधारण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी दिला आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
मुलायम म्हणाले, उत्तर प्रदेशची परिस्थिती बिघडत असल्याचे अडवाणींनी सांगितले. त्यानंतर मी परिस्थितीचा आढावा घेतला. अडवाणीजी कधीही खोटे बोलत नाहीत. सभांतही नाही. मी पुन्हा जाऊन त्यांची भेट घेईन. या स्तुतीच्या भरात मुलायम यांनी भाजपचेही गुणगान करून टाकले.
भ्रष्टाचारासाठी काँग्रेस जबाबदार : देशातील वाढत्या भ्रष्टाचाराबद्दल मुलायम यांनी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारला जबाबदार ठरवले आहे. केंद्र सरकार कमकुवत आहे, ते इतके की देशाच्या सीमाही सुरक्षित नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.