आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना मुलायम ना अखिलेश, ही लेडी आहे सर्वात मोठ्या राजकीय परिवारात सर्वाधिक श्रीमंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कुटुंबाला सोमवारी सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने विश्वनाथ चतुर्वेदी यांचा अर्ज फेटाळला आहे. चतुर्वेदी यांनी मुलायमसिंह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीसंबंधी सीबीआय तपासाची मागणी केली होती. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की यादवांच्या कुटुंबात कोणाकडे किती आहे संपत्ती. सर्व यादवांमध्ये मुलायमसिंहाची सून अर्थात मुख्यमंत्री अखिलेश यादवांची पत्नी खासदार डिंपल यादव सर्वात श्रीमंत आहे.
कोर्ट काय म्हणाले ?
- कोर्टाने या प्रकरणात सीबीआयला स्टेटस रिपोर्ट दाखल करायला सांगण्यास स्पष्ट नकार दिला.
- कोर्टाने या प्रकरणा 13 डिसेंबर 2012 मध्येच आदेश दिला होता की सीबीआयने स्वतः या प्रकरणाचा तपास करावा.
काय आहे आरोप ?
- चतुर्वेदी यांनी मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, डिंपल यादव आणि मुलायम यांचे दुसरे चिरंजीव प्रतीक यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप केला होता.
- कोर्टाने या आरोपातून डिंपल यांना बाहेर काढले होते, कारण तेव्हा त्या सार्वजनिक जीवनात नव्हत्या किंवा लोकप्रतिनिधी नव्हत्या.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणाकडे किती संपत्ती ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...