लखनौ - समाजवादी पार्टीतील वादाच्या पार्श्वभूमीवर तडजोडीचा प्रयत्न मंगळवारीही यशस्वी झाला नसल्याचे समोर आले आहे. अखिलेश मंगळवारी मुलायम यांना भेटायला घरी पोहोचले. पण सुमारे दीड तासांच्या चर्चेनंतरही प्रकरणाचा गुंता सुटला नसल्याचे पाहायला मिळाले. मुलायम यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, निवडणूक आयोगासमोर केलेली चिन्हाची दावेदारी परत घेणे आणि रामगोपाल यांना पक्षातून बाहेर काढण्याचा मुद्दा उचलला. तर अखिलेश यांनीही अमरसिंह यांची हकालपट्टी आणि स्वतःला पक्षाचा चेहरा म्हणून समोर आणण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. या मुद्द्यावर अडले दोघे..
# मुलायम यांनी मांडलेले मुद्दे..
1. राष्ट्रीय अध्यक्ष पदावर मीच राहणार असे मुलायम म्हणाले.
2. इलेक्शन कमिशनकडे केलेली निवडणूक चिन्हाची दावेदारी मागे घेण्यास सांगितले.
3. रामगोपाल यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा मुद्दा.
4. शिवपाल यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सांगितले.
# अखिलेश यांच्या अटी..
1. राष्ट्रीय अध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवावे.
2. रामगोपाल यांना पक्षात परत घ्यावे.
3. अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करावी.
4. निवडणुकांपर्यंत नरेश उत्तम यांना प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त करावे.
मुलायम म्हणाले होते, मी जाताच सर्व ठीक करेल..
- यापूर्वी मुलायमसिंह सोमवारी सकाळी म्हणाले होते, तुम्हाला माहितीच आहे की, एक दोन लोकांनी आमच्या पोराचे कान भरले आहे. माझे अखिलेशबरोबर बरेच बोलणे झाले आहे. सकाळीही बोललो. आता जातोय, बघतो काय म्हणतो ते.
- आमच्यात काहीही वाद नाही. हे प्रकरण माझ्या आणि माझ्या मुलामधील आहे. एकच व्यक्ती आमच्यात फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहे. मी जाताच सर्वकाही ठीक करेल.
दोन्ही गटांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट
- सुत्रांच्या माहिती नुसार, रामगोपाल यांनी बोलावलेले अधिवेशन वैध नव्हते. त्यामुळे त्यातील निर्णयही वैध नाहीत, असे मुलायम यांनी निवडणूक आयोगाला सांगितले.
- राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांना रामगोपाल यादव यांचा राज्यसभेतील सपात्या पक्षनेत्याचे पद रद्द करण्याची मागणीही केली आहे.
- दुसरीकडे रामगोपाल यांनीही निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यांनी निवडणूक चिन्हावर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, निवडणुकीच्या उमेदवारी यादीवरून पेटलेल्या या प्रकरणातील जुन्या वादांचा इतिहास..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)