आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलाहाबाद - सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मानवतेचा खुनी’ संबोधत टीकास्त्र सोडले. मोदींनी 2002 मध्ये गुजरातेतील मुस्लिमांचे सामूहिक हत्याकांड घडवले आणि आता त्यांची मते मिळवण्यासाठी माफी मागता, असे मुलायम म्हणाले.
भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना मुस्लिमांचा पुळका येत असल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली. मुसलमान शूर, संवेदनशील आणि विश्वासू असल्याचे सांगत मुलायम म्हणाले की, ते (मुस्लिम) मूर्ख आहेत असे तुम्हाला वाटते काय? ते तुमच्या माफीचा कसा काय स्वीकार करतील? त्यांची मते मिळवून दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याची ही तुमची चाल आहे; पण तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. तुम्ही मुस्लिमांना भाबडे समजता काय? असे मुलायम म्हणाले. मुलायमसिंह उत्तर प्रदेशची गुजरातसारखी भरभराट करूच शकत नाहीत, असा आरोप मोदी यांनी केला होता. त्यावर गुजरातमध्ये काहीही नाही. तेथील 50 टक्के मुले आणि 30 टक्क्यांहून अधिक महिला कुपोषित आहेत. देशातील सर्वात दूषित नद्या गुजरातेत आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणा-या रोजंदारी कामगारांना उत्तर प्रदेशापेक्षाही कमी पैसे मिळतात. यालाच तुम्ही (मोदी) चांगले प्रशासन आणि विकास म्हणता का? , असे मुलायम म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.